👁 10 Views

उत्तर प्रदेशातील घटनेचा पंढरपूर येथे चर्मकार युवा गर्जना संघटनेच्यावतीने जाहीर निषेध

पंढरपूर LIVE 29 डिसेंबर 2018

पंढरपूर । प्रतिनिधी,
उत्तर प्रदेश मध्ये आग्रा जवळ दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या चर्मकार समाजातील संजली जाटव या अल्पवयीन मुलीला जिवंत जाळण्याचा प्रकार घडला असुन त्याचा चर्मकार युवा गर्जना संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे शुक्रवार दि.28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर निषेध करण्यात आला. 
यावेळी चर्मकार युवा गर्जना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र शिंदे व तावशी शाखाप्रमुख अरुण क्षिरसागर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. सध्या उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनेमुळे मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचा गंभीर निर्माण झाला असून यावर सरकारच्या वतीने  तात्काळ पावले उचलून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र शिंदे म्हणाले की, चर्मकार समाजावरील तसेच बहुजन समाजावरील अन्याय अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. ही निश्चितच निषेधार्य गोष्ट आहे. यासाठी सर्वसमाज बांधवांनी संघटित राहून अशा प्रवृत्तीच्या लोकांविरूध्द लढा देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे असे सांगितले.
यावेळी  उपाध्यक्ष नितीन गवळी सचिव संतोष बनसोडे, खजिनदार परमेश्वर कांबळे सहसचिव जोतिराम कांबळे ,पोलिस पाटील अरविंद लोखंडे ,दामु शिखरे, भारत बनसोडे ,पोलिस पाटील अनिल पाखरे ,सागर खरात, विकास क्षिरसागर,  योगेश कांबळे, धनाजी गवळी, तानाजी कांबळे, विष्णू जाडकर ,  मारुती क्षिरसागर,  नितीन खाडे, नवनाथ क्षिरसागर, सुनिल आगावणे, सचिन वाघमारे, धनंजय नांदरे, धनाजी लोखंडे, मारूती क्षिरसागर, सचिन क्षिरसागर, सुनिल क्षिरसागर, समाधान गुजर,जयकांत क्षिरसागर  व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *