👁 15 Views

पंढरपूर सिंहगडचा शुभम तांदळे अविष्कार-२०१८ मध्ये प्रथम

पंढरपूर LIVE १ जानेवारी २०१९


सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने २३-२४ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अविष्कार-२०१८ मध्ये एसकेएनसिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅडइंजिनिअरींग विभागात तृतीय वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला कु. शुभम परमेश्वर तांदळे या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय अविष्कार-२०१८ मध्ये सादर केलेल्या “कॅल्क्युलेटर प्लस प्लस” या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व कॉम्प्युटर सायन्स अॅडइंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी अभिनंदन केले.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसकेएन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थी आज सर्वच क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करीत आहेत. सिंहगड महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून अभ्यासपुर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम तज्ञ प्राध्यापक करीत आहे. भारतासाठी एक टिकाऊ भविष्य घडविण्यासाठीपंढरपूर सिंहगड महाविद्यालयमहत्त्वाची भूमिका बजावत आहे. या महाविद्यालयात कुशल,अनुभवी व उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग तसेच पी.एच.डी धारक प्राध्यापक असून या प्राध्यापकच्या ज्ञानाचा फायदा पंढरपूर सिंहगड मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. पंढरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय अविष्कार-२०१८ मध्ये  “ अभियांत्रिकी तंत्रज्ञान”  शाखेतून विविध महाविद्यालयातून ५४ हून अधिक विद्यर्थ्यांनी प्रकल्प सादर केले होते.
या मधून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील कुमार शुभम तांदळे यांनी प्रथम क्रंमाक मिळविला आहे. त्याच्या या यशाबद्दल सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, कॉम्प्युटर सायन्स अॅडइंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *