👁 9 Views

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा आदर्श समाजाने घ्यावा-पाटलु आप्पा खरात

पंढरपूर LIVE १ जानेवारी २०१९


स्वेरी अभियांत्रिकीचे सोनक्यात आठवडाभर चालणार एन.एस.एस.चे श्रमसंस्कार शिबीर
पंढरपूर–‘गाव पातळीवर श्रम करताना बाहेरील जनतेला सहकार्य करण्यास आवड निर्माण होत असून सध्या वृक्षतोड थांबवून, परिसरात स्वच्छता राखणे काळाची गरज असून  नागरिकांचे आरोग्य या महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून आहे, असे असताना राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात सहकार्याने कामकाज राबविल्यास ग्रामविकास होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन सोनक्यातील जेष्ठ नागरिक पाटलु आप्पा खरात यांनी केले.
सोलापूर विद्यापीठ,सोलापूर व गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोनके (ता. पंढरपूर) मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे उदघाटन चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक भारत कोळेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक पाटलु आप्पा खरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनके गावचे सरपंच तानाजी गोफणे व उपसरपंच संभाजी शिंदे होते. प्रारंभी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. आर.एन.हरिदास यांनी श्रम संस्कार शिबिराची स्वरूप सांगितले.
विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात म्हणाले की, आमचे विद्यार्थी आपल्या गावात येऊन श्रमपरिहार करतात तरी त्याना सहकार्य करावे व आपल्याला या विद्यार्थ्यांकडून आणखी काही अपेक्षित असेल तर मार्गदर्शन करावे.’असे आवाहन केले. पहिल्याच दिवशी गावात प्रभात फेरी व ग्राम स्वच्छता करण्यावर  भर दिला. यासाठी गावातील नागरिकांनी देखील उस्फुर्त सहकार्य केले. तब्बल आठवडाभर हा उपक्रम चालणार असून यामध्ये आणखी श्रमदान,उदबोधनपर व्याख्याने,वृक्षलागवडपाण्याविषयी जनजागृतीगाव सर्व्हेजलसंवर्धन आदी कार्यक्रम तसेच आठवडाभर श्रमदानचर्चासत्रजनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याचे व प्रा.एस.एम. शिंदे यांनी सांगितले. 

आठवड्यानंतर होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोनके गावचे सरपंच तानाजी गोफणे लाभणार असून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे हे अध्यक्षस्थानी असतील. यावेळी ग्रा. पं. सदस्य समाधान मस्के, माजी सरपंच दत्तात्रय खरात व तंटा मुक्तीचे रामचंद्र कोळेकर, मोहन गेजगे,सत्यवान पाटील, आर.पी.आयचे नितीन गायकवाड,रा.से.यो.चे प्रा. एस. एम.काळे,प्रा.ए.एम.कस्तुरेप्रा. के.एस.पुकाळे, प्रा. एन.एस. पाटील, प्रा. एन.एम. मस्के,प्रा. एम.एम. शिंदे, प्रा. ए.एच. कलुबर्मे यांच्यासह रा.से.यो. व महाविद्यालय विद्यार्थी सचिव अक्षयकुमार कोरे, करण बनसोडे ,सांस्कृतिक प्रतिनिधी इषिता महाजन, संकेत कुलकर्णी, उमेश भक्ते, शुभम बंडगरगणेश रणनवरे, सुदर्शन शिंदे,भूषण बचुटे, सुशांत अलदर, महेश कांबळे, आशुतोष म्हेत्रे ,पूजा राऊत,स्मिता ढेंगळे ,रोहिणी नागटीळक व शुभदा म्हेत्रे आदी परिश्रम घेत आहेत तर सोनकेतील उपसरपंच संभाजी शिंदेग्रामसेवक एस.जी.डोके,भारत कोळेकर,नवनाथ कोळेकर यांच्यासह ग्रामस्थ सहकार्य करत आहेत.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *