👁 9 Views

जय-पराजयापेक्षा खेळ महत्वाचा – स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार

पंढरपूर LIVE 3 जानेवारी 2019

 स्वेरीत आंतरविभागीय हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदानी स्पर्धेस प्रारंभ
पंढरपूर- प्रत्येक खेळामध्ये एक संघ विजयी होणार आणि बाकी संघांना पराभव स्विकारावे लागणार आहे परंतु यामध्ये जय पराजय यापेक्षा खेळाडूंकडून खेळ आणि खिलाडीवृत्ती दाखविणे हे प्रथम महत्वाचे वाटते.  सरस कामगिरी दाखविणारा विजयी होणारच परंतु एखाद्या खेळाडूने खिलाडीवृत्ती दाखविल्याने पराभूत होवून देखील त्या खेळाडूंचे कौतुक होत असते. म्हणून जय- पराजययापेक्षा खेळ दाखविणे महत्वाचे आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार यांनी केले.     

 

एम.एस.बी.टी.ई. अर्थात महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन मंडळ अंतर्गत असेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व डिप्लोमा पॉलिटेक्निकच्या खेळाडूंसाठी स्वेरीच्या मैदानावर हॉलीबॉल व बास्केटबॉल या स्पर्धेचे आयोजन केले होते. याच्या उदघाटन प्रसंगी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. पवार खेळाडूंना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी प्रा. सोमनाथ बागल यांनी प्रास्तविकात हॉलीबॉल व बास्केटबॉल या खेळांची नियमावलीपडलेले लॉट्स याबात माहिती सांगून स्पर्धेची माहिती दिली. यावेळी पहिला सामना स्वेरी महाविद्यालय पंढरपूर व मौलाना आझाद महाविद्यालयसोलापूर तसेच श्रीरामपानीव व कर्मयोगीशेळवे यांच्यात सामना सुरु होता. संघ व्यवस्थापक प्रा. दर्शने मनोगतात म्हणाले की, ‘स्वेरीच्या मैदानवर सामने होताना पाहण्यास व खेळणाऱ्या खेळाडूंना हुरूप येतो. तसेच सामने खेळताना येथील शिस्तीला व नियमाना कोणीही बाधा आणू नये. 
यावेळी जिल्ह्यातील एकूण १५ संघांनी सहभाग घेतला होता तर मैदानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेलं होते तर खेळाडूंची व्यवस्था उतम करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील विविध तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या संघांतील खेळाडू व संघ व्यवस्थापक प्रा. घुले (पानीव)प्रा. जरग (सांगोला)प्रा. खिलारे (अक्कलकोट)प्रा. दर्शने (एस.इ.एस. पॉलि. सोलापूर)प्रा.साळुखे, (कर्मयोगी,शेळवे) पंच रेफ्री- लखन मोरेअनिल बोरकरस्कोरर अस्मिता घोलपसुदर्शन शिंदेवाघजयांच्यासह स्वेरी डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळप्रा. एस.व्ही. कुलकर्णीस्वेरीच्या फिजिकल विभागाचे रजनी वाघमोडे, प्रा. बंडगर, क्रीडा सचिव हर्षल पाटीलआदी प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *