पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2019
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधचा विषय मार्गी लागला असून त्यास मान्यता मिळालेली आहे. यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी विशेष पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल पंढरपूर शहर ओबीसी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्यावतीने त्यांचा सत्कार आज शुक्रवार दि.4 जानेवारी रोजी करण्यात आला.
यावेळी ओबीसी कॉंग्रेसचे माजी प्रदेश सचिव अशोक डोळ, सेवादलचे शहराध्यक्ष गणेश माने, शहर सहसचिव अमित अवघडे, युवकचे उपाध्यक्ष अभिषेक शहा, अनिल नळे, समाधान माळी, बालाजी देशमाने, राजू देवकर यांच्यासह आदि उपस्थित होते.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूरकडे शासनाने 1985 पासून समितीचा कार्यभार सोपवलेला आहे. त्यानुसार मंदिर समितीचे कामकाज चालते. मंदिराचे व्यवस्थापन चांगले होण्याच्या दृष्टीने कर्मचारी वर्ग नियुक्त करणे आवश्यक होते. त्यानुसार समितीने गरजेनुसार कायम, हंगामी व मानधन तत्वावर कर्मचारी नियुक्त केले होते. त्यांची सेवा 4 ते 25 वर्ष झालेली आहे. या कर्मचाऱ्यांकडून त्यांची सेवा कायमस्वरूपी स्वरक्षित करणेची मागणी होत होती. याबाबत मंदिर समितीने जुलै 2018 मध्ये 270 पदांचा (268 स्थायी व 2 अस्थायी) आकृतीबंध राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यास मान्यता मिळाल्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे कर्मचाऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







