पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2019
विद्यार्थ्यांना मिळाली ऐतिहासिक साहित्यांची मेजवानी
पंढरपूर- (संतोष हलकुडे)‘माणसाने खऱ्या साहित्यावर प्रेम केले पाहिजे. पूर्वी पाटील म्हणाल्यावर तमाशा, ऊस आणि कुस्ती याच फडाची आठवण यायची. परंतु मला मात्र ती मर्यादा मोडित काढून शब्दांच्या फडात रमायला आवडायचे म्हणूनच मागील ३० वर्षापासून मी शब्दांच्या गुऱ्हाळात रमत आहे आणि त्यातूनच साहित्य निर्मिती करत आहे. ऐतिहासिक लेखन करताना असे दिसून आले की आपल्याकडे एवढी मोठी माणसं जन्मली की ज्यांच्यासाठी चंद्र आणि सूर्याला देखील नथमस्तक व्हावे असे वाटेल. अशा थोर व्यक्तींवर लिखाण केल्यामुळे समाज मला ‘पानिपत’पासून खऱ्या अर्थाने ओळखु लागला.’असे प्रतिपादन जेष्ठ ऐतिहासिक लेखक विश्वास पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांना खास मार्गदर्शन करण्यासाठीच ‘पानिपत’कार विश्वास पाटील स्वेरीत आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ ग्रामीण साहित्यकार डॉ. द. ता. भोसले हे होते. दीपप्रज्वलनानंतर पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘तरुण मित्रांनो लढा आणि घडा’ असा मौलिक संदेश दिला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी त्यांचे स्वागत करताना ‘पाषाणालाही पाझर फोडण्याचे कार्य साहित्यिकांकडे असते.’असे म्हणाले. पुढे बोलताना साहित्यिक पाटील म्हणाले की, ‘शब्द हे जपून वापरावे. कारण ‘मराठी भाषा’ ही केवळ वाघीणीचेच ‘दुध’ नसून नागिणीचे ‘विष’ देखील आहे. मराठी भाषा पाहिजे तशी वळविता येते. एकदा लेखन सुरु केले की शब्द आपोआप धावून पुढे येतात. या शब्द मालिकेतूनच पुढे महानायक, पांगिरा, झाडाझडती, रणांगण, चंद्रमुखी या साहित्य घडले. शिवकालात गडाखालुन पाणी गडावर, विविध रांजणाच्या मदतीने शिवाजी महाराजांनी नेले. यावरून ते एक मोठे शास्त्रज्ञ होते हे देखील सिद्ध होते. इतिहासात मराठ्यांच्या स्त्रियांनी देखील पराक्रम केला आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. यासाठी ऐतिहासिक मालिका निर्माण होणे गरजेचे आहे. तरुणानी व्यक्तिमत्व विकासासाठी महापुरुषांचे आत्मचरित्र वाचावे.’ असे त्यांनी आवाहन केले.
स्वेरीविषयी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की,‘माणूस कसा घडतो आणि कुठे घडतो हे महत्वाचे आहे. अल्पावधीत यश मिळविणारे अनेक असतात,थोड्या यशाने हुरळून जाणारेही असतात पण मिळविलेले यश पचविणारे फार कमी असतात. येथील मुलींची प्रचंड गर्दी पाहता स्वेरीची ही पुण्याईच आहे.’ असे सांगून शंभूराजेंवर टीका करणाऱ्या लेखकाचा खरपूस समाचार घेताना म्हणाले की, ‘स्त्री जातीचा गौरव करणाऱ्या राजाला अलीकडील काही लेखक बदनाम करत आहेत, हे मोठे दुर्दैव आहे. जीवनात जर मोठे व्हायचेच असेल तर मित्रांबरोबर शत्रूंचाही अभ्यास केला पाहिजे.’ असे सांगून ‘भविष्यात दुर्गाबाईचे पुतळे घराघरात लावले जातील.’असे दुर्गाबाईंचे योगदान आहे.’ असे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून साहित्यिक डॉ. भोसले म्हणाले की, ‘आयुष्य हे पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर समाजासाठी, देशासाठी जगले पाहिजे. यासाठी जीवनाकडे पाहताना निदान एकतरी पुस्तक वाचले पाहिजे. कारण साहित्य हे आत्म्याच्या उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यावेळी अॅड. अर्जुन पाटील, साहित्यिक शिवाजीराव बागल, पंढरपूर व पंचक्रोशीतील साहित्यिक, पत्रकार, स्वेरीचे विश्वस्त सुरज रोंगे, डॉ. विश्वास मोरे, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कोरे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि अभियांत्रिकी, फार्मसी, एमबी.ए.या विभागातील पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीमधील जवळपास चार हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






