पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2019
पंढरपूर: दि: “ वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या कुटुंबात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला. ते पुरोगामी विचारांचे तसेच समता, न्याय, बंधुता या तत्वांना अंगीकारलेले थोर समाज सुधारक होते. त्यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून अस्पृशेतेच्या उच्चाटनासाठी जन जागरण केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते”असे प्रतिपादन सोलापूर येथील इतिहास अभ्यासक डॉ. चंद्रकांत
चव्हाण यांनी केले.
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्मृतिदिना निमित्त कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून
बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्त्रीत्वाचा आपमान करणारी मुरळी प्रथा बंद करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी जनजागृती केली. महर्षी शिंदे हे राष्ट्रीय पातळीवर विचार मांडणारे समाजसुधारक होते. या कार्यक्रमाचा
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाजातील वंचितांसाठी, अस्पृशांसाठी राष्ट्रीय स्तरावर पहिली परिषद घेतली. ते जाती व्यवस्था न मानणारे धर्म पुरुष होते.’
डॉ. गो. मा. पवार यांनी आपल्या मनोगतात‘समाजकारणात आणि राजकारणात सर्वांनी एकजुटीचा पुरस्कार महर्षी शिंदे केला होता असे विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. गो. मा. पवार, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, डॉ. राजशेखर शिंदे, मा. दत्ता गायकवाड, उपप्राचार्य बी. जे. तोडकरी, उपप्राचार्य एन. एन. तंटक, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, डॉ. एच. एम. लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. विकास कदम यांनी करून दिला. शिक्षक- शिक्षेकेतर सेवक बहुसंखेने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. राजाराम राठोड यांनी केले. आभार डॉ. एच. एम. लोंढे यांनी मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






