👁 6 Views

आगामी काळातही भाजपाचीच सत्ता येणार…! नरेंद्र मोदींनी सोलापूरात व्यक्त केला ठाम विश्‍वास… आज मी उद्घाटन केलेल्या गृहप्रकल्पाच्या चाव्या सुध्दा मीच देणार व 2022 मध्ये पंतप्रधान म्हणुन मीच 30 हजार घरांचे उद्घाटन करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2019

 ‘‘आज मी उद्घाटन गृहप्रकल्पाचे ज्याप्रमाणे उद्घाटन करतोय त्याच्या चाव्या देण्यासाठीही मीच येणार व याच पध्दतीने 2022 मध्येही मीच सोलापुरातील तीस हजार घरांचे पंतप्रधान म्हणून उद्घाटन करणार आहे.’’ असे सांगुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळातही भाजपाचीच सत्ता येणार असुन मीच पंतप्रधान होणार असल्याचा ठाम विश्‍वास सोलापूरमधील जाहीर सभेत व्यक्त केला.  ते आज सोलापूरमधील विविध  विकास ामांच्या भुमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. स्टेडियमवर हजारो लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच मैदानाबाहेरही मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उभे होते. भुवैकुंठ पंढरीचे श्रीविठ्ठल-रुक्मिणी, सोलापूर ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ आणि मंगळवेढ्याचे संतदामाजीपंत या सर्वांना सर्वप्रथम नमन करतो असे बोलुन त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. चार हुतात्मे अन् कोटणीस यांचेही त्यांनी स्मरण केले.

आम्ही दिखाव्यासाठी काम करत नाही. कामाचे नुसतेच भूमिपूजन करून निवडणुकीची वेळ मारून नेणार्‍या विरोधकांसारखे आमचे काम नाही. जिथे आम्ही भूमिपूजन करतो तिथं लोकार्पण सोहळा आम्हीच करतो, हे लक्षात ठेवा.  जनतेच्या विकासाऐवजी केवळ राजनितीतच गुरफटलेल्या कमिशनखोर अन् दलालखोर विरोधकांना देशाची चिंता नाही अशी टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खुले आव्हान दिले की, सोलापुरातील तीस हजार घरांचे उद्घाटनही 2022 मध्ये मीच करणार आहे.

राज्यातील प्रत्येक घराला वीज देण्यासाठी खूप गांभीर्याने काम करत असल्याबद्दल फडणवीस सरकार यांचेही त्यांनी कौतुक केले. सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी दिली असून यामुळे आई तुळजाभवानी भक्तांना लाभ होणार आहे. मंगळवारी (8जानेवारी) रात्री लोकसभेत गोरगरीब सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला, असे त्यांनी सांगितले, आज बुधवारी राज्यसभेत या आरक्षणाचा ठराव मंजूर होईल, त्यासाठी विशेष बाब म्हणून अधिवेशनाची वेळही वाढविण्यात आली आहे. मागासवर्गीय, आदिवासी अन भारत ओबीसी वर्गाला कदापिही त्रास न होऊ देता सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे विरोधकांना करारा जबाब दिला असल्याचे मोदी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोदी यांना पुणेरी पगडी, घोंगडं, भगवद्गीता अन् तलवार देण्यात आली. दोनशे वर्षांपूर्वी हाताने लिहिलेली भगवद्गीता मोदींनी उघडून आवर्जून पाहिली. पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शरद बनसोडे, माजी आमदार नरसय्या आडम अन महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ’मकरसंक्रात-गड्डा यात्रा’निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! अशा मराठी भाषेत शुभेच्छा दिल्या यानंतर ‘’तिळगुळ घ्या.. गोडगोड बोला…’’ असे सांगत त्यांनी पुन्हा कन्नडमध्येही शुभेच्छा दिल्या. ’हर्रऽऽ बोला हर्रऽऽऽ असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *