👁 10 Views

महाराष्ट्रातील माहोल एकदम सुरक्षीत… आय लाईक इट!

पंढरपूर LIVE 12 जानेवारी 2019

           पुणे :- खेलो इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रात आलोय…महाराष्ट्र शासनाने एकदम चांगली व्यवस्था केली आहे. आम्हाला आतापर्यंत काहीच अडचण आली नसून महाराष्ट्रातील माहोल एकदम सुरक्षीत असल्याचे सांगत “आय लाईक इट” अशी उत्स्फुर्त प्रतिक्रीया अरुणाचल प्रदेशच्या कुस्ती संघाचे प्रशिक्षक दारी लोकम यांनी आज दिली.

      

खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाळुंगे-बालेवाडी येथे कुस्तीचा संघ घेवून आलेले श्री दारी लोकम पुढे म्हणाले, अरूणाचल प्रदेशचा कुस्तीचा संघ पहिल्यांदाच खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी झाला आहे. कुस्तीचे दोन खेळाडू आम्ही स्पर्धेत उतरवले आहेत. येथील खेळाडूंची तयारी बघता आम्हाला पदकाची फारशी अपेक्षा नाही, मात्र आमचे खेळाडू सर्वांची मने नक्कीच जिंकतील. या स्पर्धेच्या निमित्ताने चांगला मंच आमच्या खेळाडूंना उपलब्ध झाला आहे.
               

या ठिकाणचा माहोल एकदम चांगला आहे, खेळाचे वातावरण चांगले आहे. अशा प्रकारची स्पर्धा प्रत्येक वर्षी घेतली तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम पुढच्या पिढीसाठी होईल. स्पर्धेचे आयोजन एकदम नेटके आणि सुंदर केले आहे. या ठिकाणी येवून आम्ही आणि आमचे खेळाडू बरेच संचित सोबत नेवू असा विश्वास श्री लोकम यांनी व्यक्त केला. 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *