👁 11 Views

स्वेरीतील ‘मेसा’च्या विद्यार्थ्यांची ‘मातोश्री वृध्दाश्रमाला’ भेट

पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2019

 


पंढरपूर-गोपाळपुरातील मातोश्री वृद्धाश्रमासाठी उर्जा देणारा ठरावा असे कार्य स्वेरीतील विद्यार्थ्यांकडून  घडले. स्वेरीतून सर्व विद्यार्थी ‘श्री संत तनपुरे महाराज मातोश्री वृध्दाश्रमा’कडे निघाले. तेथे पोहोचल्यानंतर वृध्दाश्रमात उपलब्ध असलेल्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला.                   


स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक उपक्रमाबरोबरच अनेक विधायक उपक्रम सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनीअरींग स्टुडंट्स असोसिएशन (मेसा) च्या विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. सुरवातीला ‘मेसा’चे समन्वयक प्रा..के.पारखे यांनी ‘मातोश्री  वृद्धाश्रमा’मध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. प्रसिद्ध भारुडकार सौचंदाताई तिवाडी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्राएसआरगवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपयोगी व प्रेरणादायी कार्यक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत केलेभारुडकार सौतिवाडी यांनी विद्यार्थ्यांना सुरबद्ध भारुडाच्या माध्यमातून बहुमोल मार्गदर्शन करताना आईवडिल व नाते, गुरुजन यांचे जीवनात असणारे महत्व समजून सांगून विद्यार्थ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यां यांचे वर्णन भारुड मधून ऐकविले. 

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने दिलेल्या रकमेतून वृध्दाश्रमातील वृद्धांसाठी लागणाऱ्या आवश्यक असलेल्या काही वस्तू, खाद्यपदार्थ दिले. यावेळी विद्यार्थ्यांची मनोगते झाली. वृध्दाश्रमाचे व्यस्थापक धनंजय राक्षे, श्रीकांत देशपांडे, सुनंदा छत्रे यांनी वृद्धाश्रमाची सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार पोरेरिषभ जाधवसुदर्शन शिंदेपवन गोडसेनागेश रोंगे,सावता रणदिवेअरबाज तांबोळीरोहित आदलिंगेअनिकेत चव्हाणशुभम जाधवज्योती देशमुखसुप्रिया कोळेकर यांसह १०० विद्यार्थी यांचे योगदान लाभलेतसेच यावेळी संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉबीशिंदेवर्कशॉप इन्चार्ज प्राबी.डीगायकवाडप्राएसव्हीजाधवडॉएसएसवांगीकरप्राएसएमखोमणेप्राएसएसजाधवप्राएसएमकाळे,प्रापीकेभुसेप्राव्हीजीकाळेबाग आदी शिक्षक उपस्थित होते. अरुण पुजारी व पवन गोडसे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले व विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कोरे यांनी आभार मानले.
छायाचित्र- गोपाळपूर मधील मातोश्री वृद्धाश्रम मध्ये वृद्धांची विचारपूस करताना स्वेरीचे प्राध्यापकवर्ग व 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *