👁 8 Views

नदीपात्रात मासेमारी करताना दोघे भाऊ बुडाले

 

इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरातील नदीपात्रात मासेमारी करायला गेलेले दोघे सख्खे भाऊ पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


रविवारी (दि. १२) सायंकाळी चारच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस आणि बचाव पथकाला पाचारण केले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले. पंकज पिंगळे, कृष्णा पिंगळे (रा. आवळखेड) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.


रविवारी सकाळी आवळखेड येथील काही युवक इगतपुरी तालुक्यातील देवळे गावाजवळील दारणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. 

यावेळी एक भाऊ पाण्यात बुडत असल्याचे पाहून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावला. भावाला वाचवत काठावर आणत असताना अचानक दोघेही पुन्हा पाण्यात पडल्याने बुडाले. या युवकांना शोधण्यासाठी स्थानिक नागरिक व पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, ते मिळून आले नाही. 


अखेर पोलिसांनी कसारा येथील आपत्ती टीमला घटनास्थळी पाचारण केले असून, रात्री उशिरापर्यंत या युवकांना शोधण्याचे काम सुरू होते. या दुर्दैवी घटनेमुळे आवळखेड गावावर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *