पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019
पुणे, दि. 6- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे विभागातील संबंधित यंत्रणेशी समन्वय ठेवून राज्य महामार्गाची कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे विभागातील एमएसआरडीसी अंतर्गत रस्त्याच्या कामांचा आढावा डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व एमएसआरडीसी चे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे घेण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, एमएसआरडीसी चे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी, सहव्यवस्थापकीय संचालक सी.पी. पुलकुंडवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे माहिती दिली.
यावेळी एमएसआरडीसी अंतर्गत पुणे विभागातील रस्त्याच्या कामांचा आढावा डॉ. म्हैसेकर व श्री. मोपलवार यांनी घेतला. ते म्हणाले, प्रामुख्याने पुणे- मानगाव- दिघी, सातारा- टेंभूर्णी, अहमदनगर- पुणे या मार्गातील भूसंपादनाचे प्रस्ताव एमएसआरडीसीच्या अधीक्षक कार्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे दाखल करावेत तसेच 3ए अधिसूचना काढून घ्यावी.
डॉ.म्हैसेकर म्हणाले, एमएसआरडीसी ने संबंधित जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, तहसिलदार यांच्याशी चर्चा करुन भूसंपादनाचे प्रश्न तात्काळ सोडवावेत. राज्य महामार्गाची कामे वेळेत होण्यासाठी एमएसआरडीसी ने संबंधित यंत्रणेशी व जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवून भूसंपादन व अन्य अनुषंगिक कामे गतीने पूर्ण करावीत. रस्त्याची कामे आहे त्या ROW मध्ये करण्यात येणार आहेत. आवश्यक त्या ठिकाणीच भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी, असेही त्यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी मंत्रालय, मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे राज्यातील राज्य महामार्गांच्या कामांचा आढावा घेतला.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






