👁 12 Views

सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांची फसवणूक: बीड जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह नाही

पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019

निलेश चाळक यांनी माहीती अधिकारातून केला भांडाफोड

बीड:-राज्य सरकारने 2017/18 मध्ये जाहीर केले होते कि,महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यासाठी वस्तीगृह बाधण्यात येईल; पंरतू वर्षभरानंतर ही बीड जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आणि पुन्हा एकदा मराठा विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे सामाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांनी सरकारच्या या घोषणेचा भांडाफोड केला आहे.       
याबाबत अधिक माहीती अशी कि,महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती यासह ईतर मागण्यासाठी 2016/17 मध्ये महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने लाखोंने मोर्चे काढले सदर मोर्चाची दखल घेवून मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी आँगस्ट 2017 रोजी घोषणा केली होती कि,  आम्ही मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार. त्याच्या बांधकामासाठी 5 कोटी रुपये देण्यात येतील. पंरतू मुख्यमंत्र्यांची ही घोषणा घोषणाच आहे. याबाबत  मुख्यमंञी देंवेद्र फडणवीस यांनी कोणतीही ठोस भुमिकाघेतली नाही. सदर परिस्थितीचा एक वर्षानतंर सामाजिक  कार्यकर्ते निलेश चाळक यांनी भांडाफोड केला आहे. याबाबत निलेश चाळक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या माहीती अधिकार अर्जातून बीड जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह मंजूर करण्यात आले आहे का ?

 मराठा विद्यार्थ्याच्या वस्तीग्रहासाठी एकून किती निधी मंजूर करण्यात आला आहे व त्यांच्या बांधकामाला कधी सुरूवात होईल. ही माहीती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवली होती. याबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी बीड यांना पञ काढून समाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांना मुदतीत माहीती  पुरविण्याचे आदेश दिले होते दि,23 जानेवारी 2019 रोजीच्या पञाने सहाय्यक समाजकल्याण आयुक्त समाजकल्याण अधिकारी बीड यांनी समाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांना कळवले कि,महाराष्ट्र शासनाकडून मराठा विद्यार्थ्यासाठी बीड जिल्ह्यात एक ही वस्तीग्रह मंजूर करण्यात आलेले नसून वस्तीगृह बांधकामाबाबत कोणतीही माहीती या कार्यालयात उपलब्ध नसलेचे कळविले. त्यामुऴे येणार्‍या निवडणूकीत मराठा समाज सरकार जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. असे  सामाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांनी सागितले.



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *