पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2019
माजी विद्यार्थ्यांनी समाजाला ज्ञानी करावे – एच.आर. विनोद बिडवईक
पंढरपूरः-(संतोष हलकुडे) पुण्याच्या पौड रोडवरील कोथरुड भागातील पुण्याई सभागृहाकडे जाणारे वाहतूक आज जरा जास्तच दिसत होती. पुण्याई सभागृहाची केलेले सजावट आकर्षक दिसत होती. अनेक जण नटून थटून सभागृहाकडे येत होते. विद्युत रोशनाईमुळे सायंकाळदेखील उजळून निघाली. निमित्त होते पंढरपुरच्या स्वेरीच्या माजी विद्यार्थ्यांचा‘ऋणानुबंध२०१८’ हा माजी विद्यार्थी मेळावा !
खऱ्या अर्थाने ‘कॉलेजच्या आठवणीबरोबरच मैत्रीची साठवण’ अधिक स्पष्ठ जाणवत होती. स्वेरीच्या पहिल्या बॅच (१९९८) पासूनचे विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. प्रारंभी स्वेरी अभियांत्रिकीच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.माधव राऊळ यांनी मेळावा आयोजिण्याचा हेतू सांगून महाविद्यालयाची व माजी विद्यार्थी संघटनेची यशस्वी वाटचाल सांगितली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अल्फा लवाल इंडिया प्रा. लिमिटेड’चे व्हाईस प्रेसिडेंट-एच.आर. विनोद बिडवईक म्हणाले.‘आपण या ठिकाणी शिकलो याचेच समाजाला काहीतरी देणं लागतो हा दृष्टीकोन ठेऊन आपण देखील भविष्यात समाजाला ज्ञानदान करावे तसेच इतरांना देखील नोकरी कशी मिळेल? याचाही प्रयत्न माजी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.’ या मेळाव्यात कोणी प्रशासकिय अधिकारी होते, तर कोणी स्वतःच कंपनीची निर्मिती केली होती. कोणी परदेशात स्थायिक झाले होते तर काहीजणी गृहिणी झाल्या होत्या. काही मुली पतीला सहकार्य करण्यासाठी जॉबस्विकारला होता आणि हे सर्वचजण ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’च्या निमित्ताने सभागृहामध्ये एकत्रित आले होते. त्यातीलकाहीजण पी.एच.डी. संशोधन करण्यात गुंतलेले होते. आजमात्र ते सर्वजण आठवणींच्या हिंदोळ्यांवर मनसोक्त झुलत होते.
कॉलेज जीवन संपल्यानंतर त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आलेले विद्यार्थी देखील जणू ‘ऋणानुबंध २०१८’ कार्यक्रम हा‘ट्रेडीशनल डे’ वाटत होता. अशा जोशात आले होते. स्वागत कक्षातून सर्व माजी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत होत होते.यावेळी माजी विद्यार्थी प्रमोद संगई , प्रफुल्ल भोसले, अजित लोखंडे, ज्योती कुलकर्णी, विशाल माने, आनंद रेपाळ, गुरुप्रसाद तेलकर, अमोल पाटील, शानबाग, राम काळे, स्वप्नील घोगरदरे, महेश पवार, सुरज कदम अशा अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून ‘पैसे सर्वचजण मिळवतात, परंतु अनुभव हा स्वतःलाच मिळवावा लागतो. त्यासाठी ‘हार्ड वर्क’ची गरज असते. कारण आईच्या कुशीनंतर महाविद्यालयीन जीवनातच प्रेम, आपुलकी मिळते. आम्हाला घडविण्यासाठी स्वेरीच्या प्राध्यापकांनी वेळ प्रसंगी आमच्या भवितव्यासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाचा सुरवातीला राग आला परंतु आम्ही ज्यावेळी कंपनीत नोकरीकरिता रुजू झालो त्यावेळी येथील शिस्त व प्राध्यापकांनी आमच्यावर केलेले संस्कार याचा खूप फायदा होतो.हे लक्षात आले. त्यामुळे येथील अभ्यासू वातावरणाला व उच्च शिक्षक प्राध्यापकांना आम्ही मनापासून वंदन करतो.‘ असे म्हणत काही जण भावनिक देखील झाले होते तर काही जणांनी जागतिक स्तरावर रुजवलेल्या शिस्तीचा फायदा कसा होतो ? हे पटवून दिले.
अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार म्हणाले की, ‘माजी विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहेत. त्यांना कॉलेज संपल्यानंतर जबाबदारीची जाणिव होते. शिस्तीचा फायदा त्वरीत न होता नोकरी लागल्यानंतर होतो. या शिस्तीमुळेच आपल्यात बदल होतो व नोकरीत पदोन्नती होते.आपल्यातील ‘संभाषण पध्दत व घडलेले संस्कार’ यावर नोकरीमधील गुणवत्ता दिसुन येते.’असे सांगितले. अनेक जण जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी विशेष पोज देवून छायाचित्र काढत होते. तर काही विद्यार्थी डॉ. रोंगे सर आणि प्राध्यापकांसमवेत सेल्फी घेत होते. यामध्ये स्वेरीचे विश्वस्त एच.एम.बागल यांच्यासह अभियात्रिंकीच्या स्थापनेपासून ते गतवर्षी उत्तीर्ण पर्यंतचे जवळपास ५०० विद्यार्थी उपस्थितहोते. ‘ऋणानुबंध २०१८’ हा मेळावा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.माधव राऊळ यांच्या नेतृत्वाखाली प्रा. श्रीनिवास दर्शने, प्रा.कुंभार, सचिन डुबल यांच्यासह अधिष्ठाता व इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com