👁 10 Views

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचा सुवर्ण महोत्सव…. शुक्रवारी लोटेवाडी येथे सांगता समारंभ

पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2019                   

 

 पंढरपूर (प्रतिनिधी ): सोलापूर जिल्ह्यातील नावाजलेल्या अग्रगण्य शिक्षण संस्थान पैकी एक असलेल्या सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेने शिक्षण सेवेची पन्नाशी गाठली असून या संस्थेचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. सन 2018 ते 2019 हे वर्ष या संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शुक्रवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी न्यू इंग्लिश स्कूल लोटेवाडी येथे साजरा होत आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण समारंभ पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली होत असून प्राध्यापक तुकाराम मस्के हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास सांगोला तालुक्याचे आमदार गणपतराव देशमुख, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती या शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समितीचे कार्यवाह बिडकर यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.            
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्याया सांगता समारंभास सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजीवनी केळकर, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके तसेच आटपाडी एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष अमर देशमुख आधी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
 सांगोला तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती कै. दादासाहेब शेंडे तसेच कै. अप्पासाहेब कुलकर्णी आणि कै. भाऊसाहेब कुलकर्णी या शिक्षणप्रेमी थोरांनी या संस्थेची स्थापना आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन 8 फेब्रुवारी 1968 रोजी केली होती. न्यू इंग्लिश स्कूल लोटेवाडी या शाळेच्या स्थापनेपासून आजतागायत या संस्थेच्या 8 शाखा पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात कार्यरत आहेत. न्यू इंग्लिश स्कूल लोटेवाडी, श्री दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी, देशभक्त कै. संभाजीराव शेंडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेडशिंगी, जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी, सिताराम महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खर्डी, नूतन विद्यालय कोर्टी, गणेश विद्यालय गणेश वाडी तालुका मंगळवेढा,कै. श्रीपतराव माने विद्यालय लवंगी तालुका मंगळवेढा या आठ शाखांचा यामध्ये सामावेश आहे. ही शिक्षण संस्था बहरत असताना या संस्थेने महात्मा गांधी विद्यार्थी वस्तीगृह लोटेवाडी तसेच विद्यार्थी वस्तीगृह उदन वाडी ही दोन वसतिगृहे सुरू केली आहेत. याचा फायदा अनेक मागासवर्गीय विद्यार्थी घेत आहेत. या संस्थेच्या आठ शाखांमधून 2806 विद्यार्थी शिक्षण घेत असून 138 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. 

8 फेब्रुवारी 2019 रोजी शिक्षण संस्थेस पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 8 फेब्रुवारी 2018 ते 8 फेब्रुवारी 2019 या काळात संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम तसेच माजी विद्यार्थी मेळावे घेतले गेले. या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संस्थेस माजी विद्यार्थ्यांनी भरभरून देणग्या दिल्या आहेत. या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शुक्रवारी 8 फेब्रुवारी रोजी न्यू इंग्लिश स्कूल लोटेवाडी तालुका सांगोला येथे सकाळी 11 वाजेपासून मोठ्या जोमाने साजरा होत आहे. तरी या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरुणभाऊ शेंडे, सचिव डॉ. दिलीप कुलकर्णी तसेच संचालक मंडळाकडून करण्यात येत आहे.
 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *