👁 10 Views

दुष्काळाच्या उपाय योजनेसाठी युवक कॉंग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2019

                     

पंढरपूर । प्रतिनिधी,
सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर होवून तीन महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची शासकीय पातळीवरून उपाय योजना न केल्यामुळे शेतकरी, कामगार व पशुपालक अडचणीत आलेले आहेत. या मागणीसाठी पंढरपूर- कराड रोडवर सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सदरचे आंदोलन हे सुमारे 2 तास सुरू होते. 


यामुळे या मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. आंदोलनस्थळी नायब तहसिलदार हे निवेदन स्विकारण्यासाठी आले होते मात्र आंदोलनकर्त्यांनी तहसिलदार जोपर्यंत येत नाहीत व प्रशासनाची भूमिका जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका नागणे यांनी घेतल्यामुळे या ठिकाणी तहसिलदार मधुसूदन बर्गे यांना यावे लागले व त्यांनी निवेदन स्विकारले.  त्यानंतर त्यांनी प्रशासनाच्यावतीने तात्काळ उपाययोजना सुरू करण्यात येतील असे आश्वासन दिले.             
यावेळी विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले, तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, द्रोणाचार्य हाके, ता.कार्याध्यक्ष मिलिंद भोसले, सलीम मुलाणी, बशीर मुलाणी, बंडू येडगे, सादिक मुलाणी, भारत पवार, संदिप शिंदे, नितीन शिंदे,सोमनाथ आरे, कृष्णा कवडे, अनिकेत देशमुख, सौदागर क्षिरसागर, सोमनाथ नागटिळक, हणमंत देठे, भास्कर गायकवाड, आकाश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शनिवार दि.9 फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसच्यावतीने छारा छावणी चालू करावी किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकावेत, मागेल त्या गावाला पिण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करावा, रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करावीत, दुष्काळी फळबाग अनुदान तात्काळ द्यावे, दुधाचे दर वाढवून अनुदान द्यावे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यानंतर ही शासनाने वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिला.

आक्रमक पवित्र्यामुळे तहसिलदार आले आंदोलनस्थळी
रास्तारोको आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी नायब तहसिलदार आले होते मात्र आंदोलनकर्ते जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी या ठिकाणी जोपर्यंत तहसिलदार स्वत: येत नाहीत व प्रशासनाची भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे तहसिलदार बर्गे यांना यावे लागले व त्यांनी निवेदन स्विकारले. शासनाच्यावतीने तात्काळ उपाययोजना सुरू करण्यात येतील असे सांगितले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *