👁 9 Views

आसाममधील कार्यशाळेत स्वेरीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग ‘फोल्ड्स्कोप’वर केले मार्गदर्शन

पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2019


पंढरपूर- आसाममध्ये ‘कोलॅब्रेशन फॉर ट्वीनिंग डीबीटी फोल्ड्स्कोप रिसर्च प्रोजेक्ट’ या विषयावर आयोजिलेल्या राष्ट्रीय दर्जाच्या कार्यशाळेत येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्यूटर सायन्स अँण्ड इंजिनिअरींग विभागातर्फे  प्रा. जयंत बोकेफोडे, प्रा. यशपाल खेडकर यांच्यासह रोहित कोंडे, ओंकार बोराडे, अजिंक्य घोडके, धवल दयावानपल्ली व अभिषेक गीडविर या पाच विद्यार्थ्यांनी डिक्लरेशन अँड डायग्नोसीस ऑफ मायक्रोबेस ऑन फ्रेश वॉटर फिशेश फ्रॉम द वॉटर बॉडीज ऑफ लोवरबेसिन ऑफ ब्रम्हपुत्रा ड्रानेग्स इन द चिराग डीस्ट्रीक्ट ऑफ आसाम युजींग फोल्ड्स्कोप टेक्निक’ या प्रकल्पावर बहुमोल मार्गदर्शन केले. 
 
‘युज ऑफ फोल्ड्स्कोप’ या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळा ही बिजनी (जि.- चिराग, आसाम) या ठिकाणी आयोजित केली होती त्यात येथील प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून फोल्ड्स्कोपची माहिती दिली. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व  कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगचे विभागप्रमुख प्रा. व्ही.डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.जयंत बोकेफोडे, प्रा. यशपाल खेडकर यांच्यासह रोहित कोंडे, ओंकार बोराडे, अजिंक्य घोडके, धवल दयावान पल्ली, अभिषेक गीडविर या पाच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आसाम राज्यात संपन्न झाली. 

या कार्यशाळेमध्ये तेथील विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना ‘फोल्ड्स्कोप’ हे नेमके काय आहे व त्याचा उपयोग शिक्षण घेताना कसा करावा हे शिकविले जाणार आहे.. स्वेरीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना तेथील  बिजनी महाविद्यालयाचे डॉ. सेवाली पाठक यांच्या पथकाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणावरच अवलंबून न राहता नवनवीन संशोधनाद्वारे देखील विद्यार्थ्यांनी आपले संशोधन करावे या उदात्त हेतूने स्वेरी कॅम्पसमध्ये सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांनी संशोधनाचे वातावरण निर्माण केले आहे.त्यामुळे स्वेरीच्या शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होत असताना संशोधनाच्या माध्यमातून विविध विषयावर, प्रकल्पांवर शोध सुरु आहेत. यातच भर म्हणून आता स्वेरीचे प्राध्यापकवर्ग राज्यात मार्गदर्शन करत असताना दुसऱ्या राज्यातदेखील मार्गदर्शन करण्याचे कार्य अवलंबले असल्याचे या कार्यशाळेवरून दिसून येते. यापूर्वी स्वेरीला ‘फोल्ड्स्कोप’ प्रकल्पाकरिता आठ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. संबंधित प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी.नाडगौडा, संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *