👁 7 Views

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एन.यु.एच.एम.) पंढरपुरच्यावतीने असांसर्गिक रोग तपासणी शिबीरात ३०० रुग्णांनी घेतला लाभ

पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019

 पंढरपूर– जागतिक मौखिक आरोग्य दिनाचे (५ फेब्रुवारी) औचित्य साधून पंढरपुरच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एन.यु.एच.एम.)वतीने पंढरपुरातील जुना कराड नाका येथील नागरी आरोग्य केंद्र क्रमांक २ मध्ये असांसर्गिक रोग शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा सौ. उज्वला भालेराव, महिला बालकल्याण सभापती सौ शकुंतला नडगिरे, नगरसेवक महादेव भालेराव आदी उपस्थित होते. 

         
प्रास्ताविकात वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ. राजश्री सालविठ्ठल यांनी असांसर्गिक रोगाची कारणे व ते रोग आपण कसे टाळावेत ? याबाबतची माहिती सांगून एखाद्या रुग्णाला रक्तदाबाचा त्रास अथवा शुगर असेल तर यासाठी वेळीच तपासणी करून त्यावर त्वरित उपचार करावेत याच उद्देशाने हे शिबीर घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौ. जयश्री ढवळे, दंतरोग तज्ञ डॉ. प्रसन्न भातलवंडे यांनी उपस्थितांना मौखिक आरोग्य चांगले कसे ठेवावेत? याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर्स स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वाती बोधले, हृदयरोग तज्ञ डॉ. सुरज पाचकवडे यांनी देखील रुग्णांची तपासणी केली .यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, डॉ. एकनाथ बोधले, डॉ. प्रसन्न भातलवंडे, नगरसेवक महादेव भालेराव यांनी रुग्णाला आपले आरोग्य बहुमोल असून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करून रुग्णांनी वेळोवेळी तपासणी कर्नर गरजेचे आहे असे सांगून उपस्थिताना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये शुगर, ब्लडप्रेशर, यांची तपासणी केली. 

दिवसभर चाललेल्या शिबिरात दंत रोग व स्त्रियांच्या विविध विकार असलेल्या जवळपास ३०० रुग्णांची तपासणी करून योग्य ते औषध देवून उपचार करण्यात आले. यावेळी नगरपालिका शिक्षणाधिकारी श्री मोहिते, लेखाधिकारी श्री वाघमारे, श्री बोडरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या सुपरवायझर श्रीमती वाडकर व सौ बनसोडे हे देखील उपस्थित होते. सौ तनुजा सीताप यांनी शिबिराचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *