पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता.पंढरपूर) येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग व “इंटरप्रेनर डेव्हलपमेन्ट सेल” यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय उद्योजक-व्यवसाय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होतो हि कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ.रविंद्र व्यवहारे, मार्गदर्शक प्रतिक हातजाडे, कपिश कोसागळे, डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. सर्जेराव महारनवर, विद्यार्थी प्रतिनिधी रणजित भोसले आदी मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यशाळेत स्वत:च्या पायावर व्यवसाय कसा उभा करायचा. व्यवसाय कसा करायचा तो करण्यासाठी आवश्यक गुण महत्वाचे आहेत. तुमच्या डोक्यातील कल्पना, तुमची आयडिया हि व्यवसायात अग्रेसर ठरू शकते. व्यवसाय उभा करीत असताना भांडवल खूप महत्वाचे असते. व्यवसाय हा एकत्रित करून केल्यास जास्त फायदा होतो. आजच्या काळात नोकरी पेक्षा व्यवसायात जास्त पैसा मिळतोय, म्हणून विद्यार्थ्यांनी नोकरी पेक्षा व्यवसायाला प्राध्यान्य दिले पाहिजे. तुम्ही जो व्यवसाय करणार आहे तो व्यवसाय जर आम्हाला योग्य वाटला तर आम्ही आर्थिक मदत करू असे मत प्रतिक हातजाडे यांनी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शक प्रतिक हातजाडे, कपिश कोसागळे यांनी उत्तरे दिली.
या दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व डॉ. रविंद्र व्यवहारे यांनी हि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हि कार्यशाळा ही दिनांक ०८ व ०९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली होतो.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रशांत चौगुले व कु. राणी चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. तेजस्विनी काळुंगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






