पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर (प्रतिनिधी):- नियमित सायकलींग करणे ही काळाची गरज बनली आहे. आजकालच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये आपण आपल्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहोत. आज प्रत्येकाच्या घरात दरडोई दुचाकी गाड्या आढळून येत आहेत. अगदी लहान मुलं सुध्दा सायकल ऐवजी दुचाकी गाडी चालविताना आढळतात. सायकल चालविणे म्हणजे कमीपणाचे लक्षण समजले जात आहे. परंतु तुम्हाला तुमचे शरीर जर सर्वार्थाने तंदुरुस्त ठेवायचे असेल तर सायकलींग करण्यासारखा योग्य व सोपा असा दुसरा कोणताच व्यायाम नाही. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा संतुलित व्यायाम सायकल चालवल्याने होतो. त्यामुळे किमान शहरातून प्रवास करताना तरी सायकलचा वापर करावा. असे मत मर्चंट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले यांनी व्यक्त केले. आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकलिंग असोसिएशनस् सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरीत दि. 10 फेब्रुवारी 2019 रोजी ‘पंढरी सायकल मॅरेथॉन’ उत्साहात संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन या मॅरेथॉन चा शुभारंभ पंढरपुर मर्चंड बॅकेचे चेअरमन नागेश (काका)भोसले यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक – सावरकर चौक-इंदिरा गांधी चौक-महात्मा बसवेश्वर चौक (अर्बन बँक)-भादुले चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा स्वरुपात संपन्न झालेल्या या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर्स अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी सहभाग नोंदवला. याचबरोबर आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेतील खेळाडु सुयश व्यवहारे, पवन मुसळे, नाताजी खपाले, मारुती जाधव यांनीही या मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवला.
मॅरेथॉन संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पंढरपुर मर्चंट बॅकेचे चेअरमन नागेश (काका) भोसले, आम्ही पंढरपुरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व पंढरी सायकल मॅरेथॉनचे आयोजक सागर (दादा) कदम व जिल्हा सायकलींग अशोसिएशनचे सचिव दिपक घंटे यांच्या शुभहस्ते पंढरपुर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल खेळाडुंना सन्मानचिन्ह व पत्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी जिल्हा सायकलींग असोशिएशनचे सदस्य प्रशांत कांचन-पाटील, सायकलींग प्रशिक्षक महादेव व्यवहारे, अ.भा.छावाचे सतीश माने, गणेश थिटे, विठ्ठल भुमकर, डॉ.शिंगटे, डॉ.भोसले, डॉ.पाटील, डॉ.शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. पंढरी सायकल मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्ही पंढरपुरकर फांऊडेशनचे सचिव ओंकार चव्हाण, बिपीन देवमारे, गणेश जाधव, निलेश कदम, पिंटु कुंभार,गणेश शिंदे, बाळासाहेब गोडबोले, सत्यम धुमाळ, आकाश पवार इत्यादींनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








