👁 10 Views

दहावी, बारावी परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 37 (3), कलम 144 लागू

पंढरपूर LIVE 13 फेब्रुवारी 2019

सोलापूर  दि. 13 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात दिनांक 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीत  बारावी आणि दिनांक 1 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 या कालावधीत  इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे.
      इयत्ता बारावी व दहावी परीक्षा कालावधीत सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या परीक्षा केंद्र परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (3) अन्वये बंदी आदेश लागू केले आहेत.
     
 दहावी व बारावी परीक्षा परीक्षक केंद्र आणि प्रश्नपत्रिका वितरण प्रमुख केंद्राचे ठिकाणी बेकायदेशीर जमाव करून कॉपी करण्यास मदत करणे, परीक्षा पर्यवेक्षकांना दमदाटी करणे, प्रसंगी मारहाण करणे, प्रश्नपत्रिका वउत्तरपत्रिका पळविणे वगैरे गैरप्रकारामुळे परीक्षा केंद्राचे ठिकाणी शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिनांक 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 कालावधीत होणाऱ्या  बारावी आणि दिनांक 1 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 कालावधीत होणाऱ्या दहावी  परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.
      या आदेशानुसार परीक्षा केंद्रातील 200 मीटर परिसरात सकाळी 9.00 ते सायं.18.00 वा.पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पाच किंवा पाचाहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थीनींना व त्यांना सोडण्यास येणाऱ्या पालकांना, केंद्र व्यवस्था पाहणाऱ्या परीक्षक, सुपरवायझर, शिपाई तसेच शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्ती इ. अनुषंगिक व्यक्तींना लागू पडणार नाही.असे अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.
*****

परीक्षाकेंद्र परिसरात
 कलम 144 लागू
सोलापूर दि.13 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता 12 वी ची परीक्षा  दि. 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 तर 1 ते 22 मार्च 2019 कालावधीत 10 परीक्षा होणार आहे.परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात सकाळी 9.00 ते सायं.18.00 वा.पर्यंत अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.
           

 या कलमाच्या अनुषंगाने परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर, फॅक्स , ई मेल , इंटरनेट आदी दळणवळण सुविधा बंद राहतील. वायरलेस सेट , ट्रान्झीस्टर, मोबाईल आदींचा परिक्षार्थीना वापर करता येणार नाही. पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येता येणार आहे. मात्र परीक्षा केंद्रात व परीक्षा कामासाठी नेमलेल्या स्थायी , अस्थायी अधिकारी, कर्मचारी त्याच बरोबर बंदोबस्तावर असणारे सुरक्षा कर्मचारी , पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य शासकीय अधिकारी कर्मचा-यांना हा आदेश लागू होणार नसल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी श्री तेली यांनी आदेशात नमुद केले आहे. एका पत्रकाव्दारे जाहीर केले आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *