पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019
श्रीनगर-जम्मू महामार्गावरील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरा भागात दहवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा देवभुमी पंढरीनगरी सह जागोजागी तीव्र निषेध करण्यात आला. मोठ्या प्रमाणात तरुणांनी रस्त्यावर एकत्र येत पाकिस्तानच्या झेंड्याची होळी केली.
आजपर्यत झालेल्या भ्याड हल्यांमधील हा सर्वात मोठा हल्ला असून यात जवळपास 44 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरातुन याचा तिव्र निषेध केला जात असून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी होत आहे.
या प्रसंगी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर मृत सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे,उपजिल्हा प्रमुख सुधिर अभंगराव,शहराध्यक्ष रवि मुळे,तालुकाध्यक्ष महाविर देशमुख,संजय घोडके,जयंत माने,काका बुराडे,माऊली अष्टेकर,लंकेश बुराडे,नितीन शेळके,सिद्धनाथ कोरे,सुनिल केंगार,महीला आघाडी प्रमुख संगीता पवार,अविनाश वाळके, सुरज गायकवाड, महेश भोसले, संजय शिंगाडे, सौरभ चौगुले, बबलु चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यामुळे कराडनाका परिसर दणाणून निघाला होता.
मोदी सरकारने 4200 पाक दहशतवाद्यांचा खात्मा करुन विर जवानांच्या बलीदानाचा बदला घ्यावा अन्यथा स्व.बाळासाहेबांचे शिवसैनिक देशाच्या सिमेवर जावून पाकिस्तानचा बदला घेतील.जनतेला आता सर्जिकल स्ट्राईक मान्य नसून जशास तसे उत्तर हवे आहे. सरकारने याचा विचार केला नाही तर त्यांना नक्किच गंभीर परीणाम भोगावे लागतील
-संभाजी शिंदे,जिल्हाध्यक्ष.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
-: कार्यालय :-
शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








