पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019
स्वेरीमध्ये शहीद भारतीय सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, प्रा.करण पाटील, प्रा.एम.एम. पवार, राजेंद्र झरकर व विद्यार्थी.
पंढरपूर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यातशहीद झालेल्या भारतीय जवानांना स्वेरीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांनी प्रास्तविकात दहशतवादी हल्ल्याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते शौर्य प्रतिमेचे पूजन करून हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सुपुत्रांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्वेरीच्या वसतिगृहाजवळ विद्यार्थ्यांनी भ्याड हल्याबद्धल निषेधाच्या घोषणा दिल्या.
विद्यार्थ्यांनी स्वेरी कॅम्पसमध्ये व पंढरपूर शहरात ’रॅली’ काढून पाकीस्तान मुर्दाबाद म्हणत घटनेचा संताप व्यक्त करत निषेध नोंदविला. यावेळी ’शहीद जवान अमर रहे, ‘वंदे मातरम’, भारत माता की जय’ अशा घोषणा देत पाकीस्तानचा झेंडा जाळला. शहरात काढलेल्या रॅलीत वसतिगृहातील सर्व विद्यार्थी होते. यावेळी स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
-: कार्यालय :-
शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







