Pandharpur LIVE 18 February 2019
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
या कार्यशाळेमार्फत मुख्य विषयासोबतच पुढील प्रश्नांची माहिती मिळण्यास मदत होईल. बांधकामाची क्षमता, स्लॅबमध्ये अंतर्गत भागात तडा गेला आहे का?, बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटचा दर्जा कसा असावा? त्यात स्टील आहे किंवा नाही? इमारतीमध्ये स्टील असल्यास त्याचा दर्जा कसा आहे ? इमारतीचे आयुष्मान किती आहे?अशा इमारतीसंबंधी अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन होणार असून यावर करावयाचे उपाय यावर देखील चर्चासत्र होणार आहे. या कार्यशाळेत प्रा. अविनाश कोकरे हे डिझीटल रीबाऊंड हॅमर, अल्ट्रासोनिक पल्स व्हेलॉसिटी, प्रोफोमिटर, कव्हर मीटर (रीबार लोकेटर), काँक्रीट कोअर कटर आदी माशिनींचा वापर करून इमारतीची सुरक्षितता कशी वाढवायची? याबाबत तांत्रिक प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा सुरळीत पार पडण्यासाठी सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकवर्ग परिश्रम घेत आहेत. याकार्यशाळेत बांधकाम क्षेत्राशी निगडीत बिल्डर्स, ठेकेदार, अभियंता आदी उपस्थित राहणार आहेत.अधिक माहितीसाठी या कार्यशाळेचे समन्वय प्रा.अविनाश कोकरे (मोबा. नं. ९७६६१२९१६९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.


