👁 7 Views

पंढरपूरकरांनी वाहिली वीर शहीदांना भावपुर्ण श्रध्दांजली

Pandharpur LIVE 20 February 2019

Video News

समस्त पंढरपूरकरांच्या वतीने हनुमानपेठ (वजिराबाद चौक) येथे अवंतीपूरच्या दहशतवादी हल्ल्यातील वीर जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आज मंगळवार दि. 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करुन जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. पुलवामाकडे निघालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, या हल्ल्यात 49 जवान शहीद झाले. शहीदांच्या वीर मरणामुळे सबंध देश शोकसागरात बुडालेला आहे. पाकिस्तान व दहशतद्यांच्या विरोधात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 19 फेब्रुवारी रोजी शिवयोगी मंगल भवनमध्ये पंढरीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींसह पंढरीतील व्यापारी, नगरसेवक, विद्यार्थी, गृहिणी यांनी शहीद जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी वीर जवान तुझे सलाम, वीर जवान अमर रहे, वंदे मातरम् अशा घोषणा देऊन भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शहीद वीरांच्या कुटूंबियांवर जो दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे या दु:खामध्ये आम्ही तमाम पंढरपूरकर सहभागी आहोत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे संपुर्ण देशासह आम्ही उभे आहोत. अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.   

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

 यावेळी कु.तनुश्री अमरिश इंगळे या आर्मीमधील वीर जवानांच्या कन्येने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माझे बाबा आर्मीमध्ये असल्याचा अभिमान आहे, शहीद वीर जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करताना अश्रुपुर्ण नेत्रांनी तिने वीरांना अभिवादन करताना दाटलेल्या कंठाने निक्षुन सांगितले की, या देशाच्या रक्षणास्तव मी सुध्दा माझ्या बाबांप्रमाणेच आर्मीमध्ये सक्रीय होऊन देशसेवा करणार आहे. यावेळी कु.समृध्दी विश्‍वनाथ धावणे या मुलीने देशभक्तीपर गीताद्वारे शहीद वीर जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.

 श्रध्दांजली च्या या शोकसभेचे आयोजन धिरज म्हमाने, ओंकार बसवंती,  भगवान वानखेडे व सौ.आरतीताई बसवंती यांनी केले होते.

 

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *