Pandharpur LIVE 22 February 2019
पंढरपूर दि.22 ः पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील तिर्थक्षेत्र श्री भैरवनाथ देवस्थानाच्या विकास कामांसाठी रक्कम रू.02.00 कोटी निधी मंजूर झाला असून ब वर्ग दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळविण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल भाविक वर्गांमधून समाधान व्यक्त होत आहे.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
मौजे फुलचिंचोली गांवातील लोकांच्या मागणीनुसार आमदार श्री भालके यांनी या देवस्थानच्या विकासासाठी राज्य सरकारकडे ब वर्ग देवस्थान दर्जा मिळावा म्हणून पत्र व्यवहार करून त्याचा पाठपूरावा केलेला होता. यामध्ये राज्य निकष समितीची दि.31 जानेवारी, 2019 रोजी बैठक झाली यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सचिव श्री असीम गुप्ता, उपसचिव श्री मनोज जाधव, कक्ष अधिकारी श्री तेलवेकर उपस्थित होते. या बैठकीत फुलचिंचोली देवस्थानचा ब वर्ग तिर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला असून दि.14 फेब्रूवारी रोजी मंजूरीचा आदेश पारीत करण्यात आला आहे. ब वर्ग दर्जामध्ये समावेश झाल्यामुळे या देवस्थानच्या विकास कामांसाठी रक्कम रू.02.00 कोटीचा निधी मिळणार असून यामधून श्री भैरवनाथ मंदिर परिसरातील सुशोभिकरण, पुरूष व महिलांसाठी भक्त निवास, शौचालय, वाहनतळ, हायमास्ट दिवे, संरक्षक भिंत, जोडरस्ता या सुविधा मिळणार असल्यामुळे या देवस्थानच्या भाविक भक्तांना सुखद आनंद मिळाला असून संपूर्ण गांवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार श्री भालके यांचे अभिनंदन केले जात आहे.

