👁 8 Views

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी झाल्याने त्यांच्या ज्ञानात वाढ होते- डॉ शंकर नवले

Pandharpur LIVE 2  March 2019

 पंढरपूर (प्रतिनिधी) आजच्या आधुनिक युगात इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही बरेच काही गुगल च्या माध्यमातून शिकू शकता. परंतु स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी होणे खुप महत्वाचे असते कारण स्पर्धेमुळे तुम्ही काहीतरी शिकता तुमच्याकडे नॉलेज व स्किल असले पाहिजे. स्पर्धेत तुमचे स्कील ढेव्हल्प होते. स्वतःकडे काही तरी अनुभव असेल तरच तुम्ही दुसऱ्याला ज्ञान देऊ शकता म्हणून स्पर्धेत सहभागी होणे खूप महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी झाला तरच तुमच्या ज्ञानात वाढ होईल असे मत डॉ. शंकर नवले यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले .

       कोर्टी (ता. पंढरपूर)  एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी- पंढरपुर महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागाच्या वतीने राज्यस्तरीय ‘टेक्नोझेल-२ के १९’ चे आयोजन करण्यात आले होते हि स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.  



या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेसोलापूर सिंहगड अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, डॉ. रविंद्र व्यवहारेकॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. विरेंद्रकुमार धोत्रे, प्रा. सुमित इंगोले आदी मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

        कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘टेक्नोझेल-२ के १९’ मध्ये पोस्टर प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनकोडींग सी आणि जावाब्रेन एक्ष्पो, एक्सटेम्पोरलॅन गेमिंग मध्ये एन.एस.एस.सी.एस.लुडूकिंग. वन मिनिट्स शो आदी मध्ये विद्यार्थीनी सहभाग नोंदविला. सोलापुर जिल्यातील विविध महाविद्यालयातुन अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरुपात बक्षीस,सन्मान चिन्ह प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
     या दरम्यान डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सुभाष पिंगळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सोमनाथ ठिगळे यांनी केले. तर सुत्रसंचालन कु. स्न्हेल गायकवाड व गौरी सराडे यांनी केले तरउपस्थितांचे आभार रणजित कलुबर्मे यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *