👁 10 Views

विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र नाहीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pandharpur LIVE 7 March 2019


महाराष्ट्रात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर रंगल्या होत्या. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अफवा असल्याचं सांगून विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
एकाच आठवड्यात दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतेय. तसंच कॅबिनेटच्या बैठकीत उद्या तब्बल ५० प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. नागपूर मेट्रोचं उद्घाटन आज करण्यात येतंय. यामुळे लोकसभेसह राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्यासाठी शिवसेना-भाजपची ही तयारी सुरू असल्याचा कयास लावला जात होता. नागपूरमध्ये नागपूर मेट्रोच्या उद्घाटनासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी अखेर या चर्चांवर पडदा टाकला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *