👁 5 Views

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या स्कुटीमध्ये लावलं GPS, ती जायची तिथं जायचा , फोन करायचा, अखेर….

 

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने केलेल्या धक्कादायक कृत्याची सध्या चर्चा होत आहे. गुजरातमधील सूरत येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.


येथे व्हॅलेंटाइन्स डे येण्यापूर्वी एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीच्या स्कूटीमध्ये गुपचूप जीपीएस सिस्टिम लावली. त्यानंतर तो तिच्यावर पाळत ठेवू लागला. ही तरुणी जिथे जायची तिथे हा तरुण पोहोचायचा. सुरुवातीला या तरुणीने तिकडे फार लक्ष दिलं नाही. मात्र हा प्रकार सातत्याने घडू लागल्याने तिने कुटुंबीयांना कल्पना दिली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.


पोलिसांनी सांगितले की, निकुंज पटेल नावाच्या एका तरुणाची मैत्री इन्स्टाग्रामवर एका तरुणीशी झाली. ही मैत्री प्रेमामध्ये बदलवण्याचा तरुणाचा प्रयत्न होता. मात्र तरुणी त्यासाठी तयार नव्हती. तर निकुंज हा प्रेमासाठी तिच्यावर सातत्याने दबाव आणत होता.

अशा परिस्थितीत त्याच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्याने गुपचूप तिच्या स्कूटीमध्ये जीपीएस ट्रॅकर सिस्टिम लावला. त्यानंतर ही तरुणी जिथे जिथे जायची. तिथे तिथे तो पोहोचायचा. तिच्या आसपास पिंगा घालायचा. पीडितेने सांगतले की, निकुंज तिला दिवसामध्ये अनेकदा कॉल करून त्रास द्यायचा. त्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना सांगितले की, ती जिथे जायची काही वेळात तो तिथे पोहोचायचा. तरुणीला हा प्रकार संशयास्पद वाटला. आणि तिने नातेवाईकांसोबत मिळून पोलीस ठाण्यामध्ये या तरुणाविरोधात तक्रार दिली.


तपासादरम्यान, स्कूटीच्या बॅटरीजवळ एक जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस लावण्यात आल्याचे दिसून आले. तसेच सोबतच एक सिमकार्डसुद्धा होते. जीपीएस सिस्टिम जोडून छेडछाड करणाऱ्या या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *