👁 11 Views

निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले…महाराष्ट्रात ४ टप्प्यामध्ये होणार मतदान

Pandharpur LIVE 10 March 2019



 अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज रविवारी जाहीर झाला. देशभरात एकूण ७ टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार असून पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी होणार आहे. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. तर अखेरचा टप्पा २९ एप्रिल रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र निवडणूक कार्यक्रम
११ एप्रिल – ७ जागांसाठी मतदान
१८ एप्रिल – १० जागांसाठी मतदान
२३ एप्रिल – १४ जागांसाठी मतदान
२९ एप्रिल – १७ जागांसाठी मतदान
१७ व्या लोकसभेसाठी देशातील २९  राज्यांमध्ये ७  टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल २३ मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला ११ एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे ९०  कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. गेल्या ८  दिवसांपासून उत्कंठा लागलेली घटिका समिप आली असून निवडणुकांचा बिगुल वाजला. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी केली. त्यामुळे, दिल्लीत असणारे नेते आता गल्लीकडे वळणार आहेत. तर, आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी विद्यमान खासदार आणि उच्छुक उमेदवारांची कसरत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या सर्वच मंत्र्यांना विकासकामांची उद्धाटने ८ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे बजावले होते. त्यामुळे ९ मार्चला निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हा अंदाज खोटा ठरला असून आयोगाने आज सकाळी पत्रकार परिषदेची घोषणा केली. त्यानंतर नियोजित वेळेप्रमाणे आयोजित पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा करण्यात आली. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *