👁 9 Views

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी…..उद्या रणजितसिंह मोहिते-पाटील करणार भाजपा प्रवेश

Pandharpur LIVE 19 March 2019

 अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपामध्ये  प्रवेश करणार असल्याची बातमी खरी ठरली असून ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज माण तालुक्यात केले.बुधवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील , गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. पण, विजयसिंह मोहिते – पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहेत. 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर विविध राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला होता. यानंतर रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वृत्त सर्वप्रथम पंढरपूर लाईव्हने प्रसिध्द केले होते. ही बातमी खरी ठरली असून उद्या रणजितसिंह-मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे सूपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे मात्र सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला खिंडार पडणार असून जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळत असल्याचे दिसून येत आहे. 



📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित नसल्याने भाजपने देखील माढा मतदारसंघातून उमेदवार कोण? हे गुलदस्त्यात ठेवले होते. आज राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीच्या फायदा घेत भाजपने रणजितसिंह मोहिते-पाटील यांना आपल्या बाजूने घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजपने नगर पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे राजकीय घराणे आपल्या सोबत घेण्यात यश मिळवले आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *