👁 11 Views

प्रकाश आंबेडकर आणि सुशिलकुमार शिंदे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

Pandharpur LIVE 26 March 2019



वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी काल सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही पक्षातील हजारो तरुणांची रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. 


आंबेडकर कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचीच चर्चा सुरु होती. अखेर काल आंबेडकरांनी सोलापूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसतर्फे माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. सोमवारी सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. आंबेडकर आणि शिंदे यांनी काढलेल्या रॅलीमध्ये हजारो समर्थक सहभागी झाले होते.

आंबेडकरांनी सोलापुरातून उमेदवारी अर्ज भरून या मतदार संघात शिंदेंपुढे कडवे आव्हान निर्माण केले आहे. तर दुसरीकडे भाजपने जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी तिरंगी लढत जास्त चुरशीची होणार आहे. मात्र, दोन्ही नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनाचीच चर्चा काल सुरु होती.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *