डीवायएसपी डॉ सागर कवडे आणि पत्रकार संजय पाठक यांचे कार्य समाजाभिमुख –भागवताचार्य वा. ना. उत्पात
पंढरपूर – पत्रकारिता आणि प्रशासकीय सेवा ही सकारात्मक असली पाहिजे प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोण हा रचनात्मक अन विकासात्मक असला की समाजाला त्यांच्या कार्याची दखल ही घ्यावीच लागते नेमकं तेच काम डॉ सागर कवडे व संजय पाठक यांनी केले असल्याचे गौरवोद्गार भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी काढले .
पंढरपूर पत्रकार संघटना आणि भारत विकास परिषद यांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार संजय पाठक , उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या सत्कार समारंभ सोहळ्यात उत्पात बोलत होते. श्री पाठक त्यांच्या ‘सुखद’ काही या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालयात स्थान मिळाले अनेक नामवंत संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले. डीवायएसपी डॉ कवडे यांच्या गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागांमध्ये केलेल्या कामाची दखल शासनाने घेतली. आणि त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल विशेष पोलीस पदक प्रदान करण्यात आल्याबद्दल डॉ कवडे यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला.
📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details… ➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com