पंढरपूर- गरुड फिल्म्स ची निर्मिती असणारा ‘धुमस’ हा बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या टीमने काल पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी को.प्रोड्युसर डी. गोवर्धन, डायरेक्टर शिवाजी दोलताडे व कलाकार रोहन पाटील, कृतिका गायकवाड, साक्षी चौधरी व पंढरपूर चे प्रा.सुभाष मस्के या सर्वांनी चित्रपटाबाबत व प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सर्वांनी पंढरपूर लाईव्ह ने ‘धुमस’ चित्रपटाला दिलेल्या प्रसिध्दीबद्दल समाधान व्यक्त करत पंढरपूर लाईव्हला शुभेच्छा दिल्या. पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांनी धुमस च्या सर्व टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ओंकार बसवंती धीरज साळुंखे, शंकरराव पवार आदी उपस्थित होते.
——————————————————-
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर Live ”
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304