पंढरपूर-करकंब रस्त्याचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. प्रवाशांच्या सोई पेक्षा गैरसोय होण्याचा प्रयत्न होताना दिसतो. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून प्रवाशांचे नियमित हाल सुरू आहेत. पर्यायी रस्त्यावरील खड्डे, वेळोवेळी पाणी न मारल्याने उडणार्या धूळीने आतोनात हाल सोसत असताना प्रवाशांच्या हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.
काही रस्ते तर काम सुरु होताना खोदलेले आहेत, अजुनही त्यांच्यावर कोणताच उपचार झालेला नाहीत.. असं असताना अनेक भाविक पंढरपूरला याच महामार्गाने येतात त्यात कहर म्हणजे जड वहातुकीलाही या महामार्गावर परवानगी मिळाल्याने अवजड वाहनेही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. आगीतून फुफूट्यात पडणे ही म्हण सार्थ होताना प्रवाश्यांना अनुभवास मिळत आहे. त्याही पुढचा कहर म्हणजे कोणते डायर्व्हशनचे बोर्ड कोठे लावायला पाहिजेत याचीही तसदी कंत्राटदार घेतांना दिसत नाही. अनोळखी चालक रात्री अपरात्री आल्यास बोर्डाच्या माध्यमातून गेल्यास त्याची व सहप्रवाशांची काय अवस्था होईल हे वेगळे सांगायला नको.
पण ह्याची जबाबदारी कोणावर असेल हे आजच्या जमान्यात सांगायला नको. पण शेवटी जाणार्याचं काय? तो कधीच माघारी येणार नाही. त्याची वाटं पाहणारं त्याच्या घरी कोणीतरी असणार आहे… पण हे कोणाला तरी कळणं गरजेचं आहे.


