-
-
रिसोड (वाशिम): गरिबीला कंटाळून पंचवीस वर्षीय महिलेने तिच्या जुळया मुलींसह विहीरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास रिसोड तालुक्यातील सवड शेतशिवारात घडली. रिसोड तालुक्यातील मोहजा येथील २५ वर्षीय महिला इंदुबाई राम शिंदे हिने तिच्या ईश्वरी आणि ज्ञानेश्वरी या एक वर्षीय जुळया मुलींसह गुलाबराव गवळी यांच्या शेतामधील विहीरीत उडी घेवून आत्महत्या कली. त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकर्यांना दिसले. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत महिला भूमिहीन असून, तिचे पती गत दोन महिन्यांपासून घर सोडून गेले होते. उदरनिर्वाहाच्या प्रश्नातून ही आत्महत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही महिला सासू आणि दोन मुलींना सोबत घेऊन राहत होती. गरिबीला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
Posted inMaharashtra
