अनुष्का बनणार ‘सुलतान’ची हिरॉईन

Loading

मुंबई, दि. ९ – अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित ‘सुलतान‘ चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका निभावणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे, मात्र आता ती उत्सुकता संपली असून‘सुलतान’च्या बेगमची भूमिका करणा-या अभिनेत्रीचा शोध संपला आहे. सौंदर्यवती आणि तितकीच उत्कृष्ट अभिनेत्री असलेली अनुष्का शर्मा सलमानसोबत या चित्रपटात झळकणार आहे. ‘सुलतान’ चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर अनुष्का-सलमानचा फोटो अपलोड करू याबाबतची माहिती देण्यात आली असून अनुष्का शर्मानेही तिच्या ट्विटर अकाऊंटवर ही न्यूज शेअर केली आहे. 
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या ‘सुलतान’ चित्रपटात सलमान खान ४० वर्षांच्या हरियाणी पैलवानाची भूमिका साकारत असून आदित्य चोप्रा या चित्रपटाचा निर्माता आहे. या वर्षी ‘ईद’ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेली अनुष्का शर्मा आता तिनही ‘खान’ सोबत काम करणारी अभिनेत्री बनली आहे. पदार्पणातच तिने शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ व नंतर‘जब तक है जान’मध्ये काम केले तर गेल्या वर्षी आलेल्या ‘पीके’मध्ये ती आमिर खानसोबत झळकली. आणि आता सुलतानद्वारे ती सलमानसोबत काम करणार आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *