‘सहकार शिरोमणी’च्या साखर पोत्याचे पूजन

Loading

सहकार शिरोमणीच्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता एस. बी. साळे, अध्यक्ष कल्याणराव काळे, एस. बी. गाडेकर, शिवराज अणदुरे, उपेंद्र, ए. सी. टिप्रमवार आदी. पंढरपूर : चंद्रभागानगर-भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर काखान्याच्या १८ मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पातून वीज वितरण शुभारंभ व चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या २ लाख १५ हजार ३३३ व्या साखर पोत्याचे पूजन राज्य वीज वितरणचे अधीक्षक अभियंता एस. बी. साळे यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे होते. यावेळी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ, उपकार्यकारी अभियंता राजेश मदने, उपकार्यकारी अभियंता हरिभाऊ करंडे, कनिष्ठअभियंता रणदिवे उपस्थित होते. कारखान्याने आर्थिक अडचणीवर मात करून १८ मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रारंभी १0 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. उर्वरित ८ मेगावॅट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चालू करण्यात येणार आहे. सध्या प्रतितास ५ मेगावॅट वीज वितरण कंपनीस वितरित करण्यात येत असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले.
चालू गळीत हंगामात मशिनरी आधुनिकीकरणामुळे दैनंदिन गाळपात प्रतिदिनी एक हजार मे. टनाने वाढ होऊन प्रतिदिन ४२00 गळीत होऊन कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालू आहे. आजअखेर २ लाख १५ हजार ५00 मे. टन ऊस गळीत करून २ लाख १५ हजार ३३३ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी १0.0९ टक्के उतारा मिळाला असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी सांगितले.
यावेळी आयडिया कंपनीचे संचालक एस. बी. गाडेकर, शिवराज अणदुरे, सिटसन इंडियाचे अभियंता उपेंद्र, एमएससी बॅँकेचे अधिकारी ए. सी. टिप्रमवार, साखर व्यापारी राजकुमार दोशी, पं.स. माजी सदस्य सुरेश देठे, बाळासाहेब काळे, कारखान्याचे माजी उपाध्यक्षमारूती भोसले, संचालक राजेंद्र शिंदे, मोहन नागटिळक, संभाजी बागल, इस्माईल मुलाणी, अंगद पवार, भारत भुसे, राजाराम पाटील, आण्णा शिंदे, भारत कोळेकर, राजसिंह माने, पांडुरंग कौलगे, दिनकर कदम, तानाजी जाधव, शहाजी पासले, भारत गाजरे, दीपक गवळी, कुलदीप पाटील, बंडू पवार, रावसाहेब पवार, कार्यकारी संचालक एस. एस. बेल्हेकर, के. आर. कदम, जी. डी. घाडगे, एस. ए. सरगर, पी. डी. घोगरे, पी. व्ही. गिरमे, व्ही. आर. पाटील, एस. एस. काझी, सी. जे. कुंभार, एन. जे. इंगळे, जे. जी. पाटील, आर. डी. हाजगुडे, एस. सी. भगत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रावसाहेब पवार यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *