करकंब : मुलींना विविध क्षेत्रात काम करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध असून अंगी असलेल्या कलागुणांचा विचार करून क्षेत्र निवडावे. मुलींनी शालेय शिक्षण घेत असताना आत्मविश्वास बाळगला पाहिजे, आत्मविश्वास बाळगल्यास नक्कीच यश मिळते, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी केले.
करकंब (ता. पंढरपूर) येथे किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपसरपंच सारिका पुरवत, ग्रा.प. सदस्या आनंदी व्यवहारे, मुख्याध्यापिका देवकी कलढोणे, शीतल जाधव, शिक्षणविस्तार अधिकारी महालिंग नकाते, केंद्रप्रमुख दिगंबर काळे, आप्पा माळी, विश्वनाथ केमकर आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी स्त्री-भ्रूणहत्येवर नाटिका सादर केली. प्रास्ताविक श्रावणी वेळापूरकर या विद्यार्थिनीने केले. देवकर कलढोणे यांनी आभार मानले