पंढरपूर अर्बन बँकेच्या राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवातील जल्लोष…. महोत्सवाच्या समारोपात सिनेअभिपनेत्री हेमांगी कवी सह सारेगमपा फेम मुग्धा वैशंपायन ने आणली रंगत..

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या दि पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेने आयोजित केलेला राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सव-2016 चा समारोप सोहळा बँकेचे चेअरमन आमदार श्री.प्रशांत परिचारक व सिनेअभिनेत्री हेमांगी कवी व सारेगमपा फेम मुग्धा वैशंपायन यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पंढरीच्या मध्यवर्ती असणार्‍या टिळक स्मारक मैदानामध्ये गायन, नृत्य, नाटक अशा विविध कलांनी नटलेल्या या स्पर्धेच्या तालावर अवघी पंढरीत मागील चार दिवसापासून एकच तरूणाईचा जल्लोष होता.

समारोपास उपस्थित असलेल्या सिनेअभिनेत्री हेमांगी कवी यांनी, बघतोय रिक्षा वाला…., सख्खा दाजी गेला ….., फंटास्टिक लावणी या गाण्यांवर अप्रतिम नृत्याने तर, सारेगमपा फेम मुग्धा वैशंपायन यांनी, जांभूळ पिकल्या झाडाखाली…, उगवली शुक्राची चांदणी….,खंडेरायाच्या लग्नाला…, डोक फिरलया… मुंगळा…एकविरा आई… या आपल्या सुमधुर आवाजाने पंढरीतील सर्व रसिक श्रोत्यांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना बँकेचे चेअरमन आमदार श्री.प्रशांत परिचारक म्हणाले की, चार वर्षापुर्वी सुरू केलेल्या या स्पर्धेस राज्यातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. युवकांना कलाक्षेत्रातही स्पर्धात्मक वाव या व्यासपीठाव्दारे मिळत आहे. पुढील काळात अशा विविध कलात्मक स्पर्धांचा समावेश या महोत्सवात केला जाईल. पंढरपूरात सध्या अनेक उदयोत्मुख कलाकार निर्माण होत आहेत, तसेच पंढरपूरात चित्रीत होणार्‍या विविध चित्रपटातून त्यांना काम करण्याची संधीही मिळत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विविध कलाकारांमुळे पंढरपूरला एक सांस्कृतिक ओळखही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
टिळक स्मारक मैदानावर पार पडलेल्या राज्यस्तरीय युवा महोत्सव-2016 नाट्यप्रतिभा स्पर्धेत प्रथम क्रमांक अस्तित्व मेकर्स, सोलापूर, व्दितीय क्रमांक उत्पात ग्रुप, पंढरपूर व तृतीय क्रमांक जोगेश्‍वरी युथ क्लब, सांगली यांना तर सूगम गायन स्पर्धेत आनंद भालेराव यांना प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक कोमल कुलकर्णी, तृतीय क्रमांक उत्तम भुतके तसेच वैयक्तीक नृत्य स्पर्धेत किशीगंधा कापरे यांना प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक अंबिका कुलकर्णी, तृतीय क्रमांक ऋषिकेश कुलकर्णी आणि युगुलगीत स्पर्धेत अभय निखील प्रथम क्रमांक, उत्तम भुतके ग्रुप व्दितीय क्रमांक, स्मिता व राहूल तृतीय क्रमांक, तसेच समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक ऑक्सर डान्स अ‍ॅकडमी, व्दितीय क्रमांक बीट टु बीट, सांगली, तृतीय क्रमांक मल्हार ग्रुप, सांगली यांनी पटकावला.

त्याचप्रमाणे कर्मयोगी सभागृह व महिला शाखा, पंढरपूर येथे पार पडलेल्या सुरवाद्य प्रतिभा स्पर्धेत प्रथम अभय अजित पोतदार, व्दितीय क्रमांक प्रसाद आदिनाथ विभुते, तृतीय क्रमांक अमेय चिंतामणी बेडेकर तसेच शिल्पप्रतिभा स्पर्धेत प्रथम क्रमांक रामचंद्र तानाजी जाधव, व्दितीय क्रमांक प्रविण चंद्रकांत नगरे, तृतीय क्रमांक निखील राऊत व ज्ञानेश्वर कुंभार संयुक्त आणि चित्रप्रतिभा स्पर्धेत प्रथम क्रमांक अमित चंद्रकांत ढाणे, व्दितीय क्रमांक अभिजीत विलास जाधव, तृतीय क्रमांक अक्षय अगतराव उपासे व एकपात्री प्रतिभा स्पर्धेत पूनम जालिंदर चव्हाण, प्रथम क्रमांक, विजया भागवत उत्पात व्दितीय क्रमांक, अभय मुरलीधर चव्हाण तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

सर्व विजेत्यांना रोख रक्कम व युवा प्रतिभा महोत्सवाची आकर्षक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र भेट स्वरूपात देणेत आले. अर्पिता खाडीलकर यांनी सुत्रसंचालन केले.
स्पर्धेचे परिक्षण नृत्य परिक्षक म्हणून चारूशिला पाटणकर, सायली पेंडसे, चंदन शेट्टी, गायन परिक्षक म्हणून गिरीष जोशी, वैभव साने, चंदनाताई देशपांडे, सुरवाद्य परिक्षक म्हणून श्रीराम पोतदार, विलास गोटेकर, नाट्य परिक्षक संजय डोळे, नितीन बाबर यांनी केले. त्यांचाही यावेळी संचालक मंडळातर्फे सत्कार करणेत आला. तसेच हेमांग कवी यांचा सत्कार सौ.सीमाताई परिचारक तर मुग्धा वैशंपायन यांचा सत्कार सौ.माधुरी जोशी, सौ.रेखाताई अभंगराव यांचे हस्ते करणेत आला.


मुलाखत देताना हेमांगी कवी व मुग्धा वैशंपायन यांनी बँकेने या कार्यक्रमाचे निमित्ताने आम्हांला पंढरपूरला यायची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्ती केले. मेहनत केल्याशिवाय फळ मिळणार नाही, यासाठी प्रचंड इच्छा शक्तीची आवश्यकता आहे, भरपूर प्रयत्न करा यश मिळलेच असेही त्यांनी विजयी व सहभागी युवा स्पर्धक कलाकारांना शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी बँकेचे संचालक रजनीश कवठेकर, सतीश मुळे, उदय उत्पात, हरिष ताठे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, पांडुरंग घंटी, चंद्रकांत निकते, भाऊसाहेब जगताप, सोमनाथ होरणे, मुन्नागीर गोसावी, रामचंद्र माळी, मनोज सुरवसे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे व युवा प्रतिभा समितीचे सदस्य सर्व नगरसेवक व विविध संस्थाचे पदाधिकारी, पत्रकार आदी मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करणेकरिता श्री.विनोद शेेंडगे, श्री.अतुल अंमळनेरकर, श्री.वैभव जोशी, श्री.संदिप पिटके, श्री.विशाल तपकिरे, श्री.भैय्या मनमाडकर, श्री.निलेश बडवे, श्री.व्ही.एम.कुलकर्णी, श्री.विलास जोशी, श्री.अमित वाडेकर, श्री.विवेक कुलकर्णी तसेच पंढरपूर अर्बन बँक व कर्मयोगी कॉलेजचे कर्मचारी, लोकमान्य मंडळ आदींनी परिश्रम घेतले. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *