पंढरपूर 04- पंढरपूर तालुक्यातील सुपली या गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अनिल
विभूते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक नरळे, पांडूरंग
साखर कारखाण्याचे संचालक बाळासाहेब यलमार, ग्रामपंचायत सदस्य कांताबाई लाळे, दत्ता भोसले,
नागा माळी, बाळासाहेब यलमार (बी.वाय.ॲग्रो चे डायरेक्टर) आदी उपस्थित होते. पंढरपूर पत्रकार
संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कोरके-पाटील यांनी अध्यक्ष विभूते यांचे अभिनंदन केले.

