पेट्रोलवर धावणारी सायकल, १ लिटरमध्ये २०० किमी अंतर

आग्रा : एक लिटर पेट्रोलमध्ये चक्क २०० किमी अंतर ताशी ३५ वेगाने सायकल चालू शकते का? याचे उत्तर हो असेच आहे. आग्रा येथील पाच विद्यार्थ्यांनी पेट्रोलवर धावणारी सायकल तयार केलेय. त्यासाठी शेतात औषध मारण्यासाठी लागणाऱ्या मशिनचा वापर केलाय.

पेट्रोलची टाकी बसविण्यासाठी सायकलच्या पाईपचा वापर करण्यात आलाय. टाकीची क्षमता १ लिटर असून मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीप्रमाणे या सायकलची टाकी आहे. तर हॅंडलला एक्सीलेटरचे रुप देण्यात आले आहे.

ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी ही सायकल बनविली आहे. मुकुल गौड, विक्रांत रावत, रंजूल मिश्रा, सुधांशु गोस्वामी आणि तुषार गोयल यांनी यासाठी मेहनत घेतली. त्यांनी यू-ट्यूबवर अमेरिकन पेट्रोल बाईक पाहिली आणि त्यांना ही कल्पना सुचली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *