मुंबई :- ऊर्जा संवर्धन उपक्रमाचा एक भाग म्हणून एलईडी दिव्यांचे मोठ्या प्रमाणात वितरण करणाऱ्या एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिस लिमिटेड (ईईएसएल) ने ठामपणे सांगितले आहे की, त्यांनी महाराष्ट्रामध्ये वितरीत केलेल्या बल्बमध्ये भारतीय मानक ब्यूरोने सांगितलेल्या ल्यूमिनन्स अर्थात प्रकाशतीव्रता मानकांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात वितरीत केलेल्या 7 वॅटच्या बल्बचा उजेड कमी असल्याने ते अकार्यक्षम असल्याच्या प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केलेल्या बातम्यांचे ईईएसएलने जोरदार खंडन केले आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितला पाठवलेल्या पत्रात ईईएसएलने स्पष्ट केले आहे की, त्यांनी जळगाव येथून बल्बचे नमुने आणून त्यांचे राष्ट्रीय मान्यताप्राप्त मंडळाच्या प्रयोगशाळेत परिक्षण केले असून बल्बमध्ये योग्य प्रकाशतीव्रता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ईईएसएलने अधिक तपशीलवार माहिती देताना हे नमूद केले आहे की, बीआयएम्सच्या मानकांनुसार 7 वॅट एलईडी बल्बची सुरुवातीची ऊर्जाही 8.05 वॅट पेक्षा अधिक नसावी आणि बल्बचे ल्यूमिनन्स फ्लक्स प्रकाशप्रवाह 540 लुमेनपेक्षा कमी नसावे
ईईएसएलने सांगितले की, महाराष्ट्रात वितरित केलेले 7 वॅट इलईडी बल्ब हे 583-603 लुमेन दरम्यानचे आहेत आणि म्हणूनच सर्व आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. बीआयएसने आदेश दिल्याप्रमाणे इंटिग्रेटींग सफायर सिस्टीम व गोनीओफोटोमीटर पध्दतीने वापरून नियंत्रित स्थिती अंतर्गत चाचणी करण्यात आली, मराठवाडा तंत्रज्ञान संस्थेने लक्स मीटर पध्दतीने चाचणी केली. त्यामुळे खुल्या वातावरणात ल्यूमिनन्स फ्लक्सची मोजणी करण्यात आली आणि अंतत: चुकीचा निकाल समोर आला.
ईईएसएलने वितरित केलेल्या बल्बचे विविध मूल्यांची मोजणी करण्यासाठी वापरात आणलेल्या सर्व पध्दती सातत्याने राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये निरीक्षण करण्यात येते असा दावा ईईएसएलने केला आहे.
एलईडी बल्बची किंमत 300 रुपयांवरून 70 रुपयांपेक्षा कमी आणण्यामध्ये ईईएसएलची महत्त्वाची भूमिका आहे. केंद्राच्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय क्षमता प्रकाशयोजना कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 5 कोटींहून अधिक एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एक कोटी एलईडी बल्ब वितरीत करण्याचे पण एमएसडीईएलचे लक्ष्य आहे.
