👁 2 Views

तालुक्यातील कृषी विक्रेते संघाचा भारत बंदसाठी पाठींबा

पंढरपूर-

 शेती औषधे व बि-बियाणे तसेच खते यांची विक्री करण्यासाठी केंद्र शासनाने कृषीपदवी व पदविका यांना सक्ती केल्याने पंढरपूर तालुक्यातील तसेच शहरातील कृषी औषधे व बि-बियाणे विक्रेत्यांचा भारत बंदला दुकाने बंद करुन पाठींबा  दिला आहे.भारत बंदचे निवेदन तहसिलदार नागेश पाटील यांना संघटणेच्या वतीने देण्यात आले. यावेळी राजाभाऊ देशमुख, राजेंद्र कोरके पाटील, संदीप नळदवार, राहुल शिंदे, अमर गडम, स्वामी, शिरीष थोरात , किशोर देशपांडे यांच्यासह शहर व तालुक्यातील सर्व विक्रेते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *