असंघटीत खाजगी कामगारांच्या न्याय्यहक्कासाठी राज्यव्यापी लढा उभारणार- अरुणभाऊ कोळी

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 

कोळी समाजाचे नेते अरुणभाऊ कोळी  यांनी महाराष्ट्रातील असंघटीत कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी मोठा लढा उभारण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतलेला असून यासाठी त्यांनी असंघटीत कामगारांसाठी न्यायहक्क संघर्ष समिती स्थापन्याची तयारी सुरु केली आहे. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे पगार लवकर अदा न केल्यास धरणे आंदोलन करणारपंढरपूर नगरपरिषदेच्या कामगारांचे पगार वेळेत केले जात नाहीत. पंढरपूर शहर स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी तन-मनाने अहोरात्र काबाडकष्ट करत असतात, त्यांचे पगार वेळेत केले जात नाहीत ही प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. हातावरचे पोट असलेल्या आमच्या या  कामगार बांधवांचे पगार जर लवकर दिले गेले नाहीत  तर आपण धरणे आंदोलन करु अशी माहिती यावेळी अरुणभाऊ कोळी  यांनी दिली.


एकीकडे शासकिय नोकर्‍यांची वाणवा तर दुसरीकडे वाढत्या बेरोजगारीमुळे निर्माण झालेली नोकर्‍यांची अनुपलब्धता तर परिस्थीती अभावी शिक्षण अर्धवट सोडल्यामुळे पोटापांण्यासाठी करावी लागणारी अल्पपगारातील खाजगी नोकरी पत्करुन शहरी अथवा निमशहरी भागातील अनेक खाजगी आस्थापनामधील कामगार कसाबसा आपला उदर निर्वाह करीत आहेत.हे कामगार असंंघटीत असल्याने त्यांना अनेकवेळा मोठ्या अन्यायाचा,गळचेपीचा सामना करावा लागत असुुन दाद कुणाकडे मागायची या विचाराने हा अन्याय मुकपणे सहन केला जात असल्याचे दिसून येत आहे.अशा असंघटीत खाजगी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण असंघटीत खाजगी कामगार न्यायहक्क संघर्ष समिती स्थापन करुन लढा उभारणार असल्याची माहीती या समितीचे संस्थापक अरुणभाऊ कोळी यांनी दिली आहे.
               
या बाबत अधिक माहीती देताना अरुणभाऊ कोळी म्हणाले की,गेल्या 30 वर्षापासुन आपण विविध विषयांवर जनतेच्या हक्कासाठी संघर्ष केला आहे.कोळी समाजाच्या प्रश्‍नासाठी मोठा लढा उभारला आहे.सार्वजनिक जिवनात वावरत असताना आपल्या आजुबाजुला खाजगी दुकाने,व्यापारी आस्थापना त्याच बरोबर बांधकाम व्यवसायीक,ठेकेदार,सुरक्षा एजन्सी,मजुर पुरवठा संस्था आदींच्या माध्यमातुन खाजगी नोकरी करीत असलेल्या अनेक कामगारांवर केवळ ते असंघटीत असल्याने अन्याय होत असल्याचे आपणास आढळून आले.शासनाने कामगार विषयक कायद्यात अनेक सवलती,कल्याणकारी योजना याचा समावेश केला आहे.मात्र त्याची माहीती नसल्याने तसेच सुयोग्य संघटीत पाठबळ मागे नसल्याने कामगारांना त्याचा लाभ होताना दिसून येत नाही.अशा कामगारांना एकत्र आणून त्यांच्या हितासाठी असंघटीत खाजगी कामगार न्यायहक्क संघर्ष समिती पाठपुरावा  करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
         
या संघर्ष समितीच्या माध्यमातुन अन्यायग्रस्त कामगारांना योग्य ती कायदेशीर मदत मिवळवून देण्याचीही भूमिका पार पाडली जाणार असुन कामगारांच्या मुलांसाठी शालेय मार्गदर्शन शिबीर,स्पर्धात्मक संस्कार शिबीर तर कुटुबीयांच्या आरोग्यरक्षणासाठी आरोग्य तपासणी शिबीर,सामुदायीक विवाह सोहळा आदींच्या माध्यमातुन समिती कामगारांना सहकार्य करणार आहे.तरी या क्षेषात काम करु इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांनीही आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले होते.
पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष  नुतन रामभाऊ सरवदे, उपाध्यक्ष भगवान वानखेडे, राजेंद्र कोरके, प्रसिध्दीप्रमुख राजकुमार शहापूरकर, श्रमीक पत्रकार संघाचे सचिव संजय वाईकर व खजिनदार ज्ञानेश चांडोले यांचे सत्कार अरुणभाऊ कोळी  यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी कोळी समाजातील अनेक युवक,  दलित स्वयस्वयंसेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे व अनेक पत्रकार उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *