सर्व सामान्य कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी,हितासाठी स्व.नारायणराव धोत्रे यांनी फार मोठे परिश्रम घेतले होते.त्यांच्या कार्यातुन त्यांनी जी माणसे जोडली त्यांच्या ओठी स्व.नारायणराव धोत्रे यांच्यामुळेच आपल्यास न्याय मिळाला हीच भावना असल्याचे दिसुन येते.हातावर पोट असेल्यांच्या हक्कासाठी लढा देत त्यांनी पंढरीत एक आदर्श निर्माण केला होता म्हणूनच शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना दलितमित्र हा बहुमान देवुन गौरविले होते असे मनोगत मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांनी व्यक्त केले.पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष स्व.नारायणराव धोत्रे यंाच्या 5 व्या स्मृती दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी बोलताना जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांतराव परिचारक म्हणाले की,एखादा व्यक्ती स्व.नारायणराव धोत्रे यांच्याकडे काम घेवुन गेला की ते काम झालेच म्हणून समजा मग ते कितीही अडचणीचे असो याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.गरीबांना न्याय मिळाला पाहीजे याचा ध्यास घेवुन केलेले कार्य जनता विसरत नाही.त्यामुळेच आज त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यासाठी ही अलोट गर्दी झाली आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय धोत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन नागेश धोत्रे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याचे नुतन आमदार प्रशांत परिचारक यांचा प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या वतीने नगरसेवक दगडू धोत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख हे होते.तर मा.नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे,नगरसेविका रंजनाताई पवार,मा.नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,नगरसेवक सचिन डांगे,मा.नगरसेवक अनिल अभंगराव(सर),अंकुश पवार,न.पा.प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्य गणेश पवार,नगरसेवक महेश साठे,सत्यविजय मोहोळकर,नगरसेवक शिवाजी कोळी,नगरसेवक विक्रम शिरसट,रा.पा.कटेकर,नगरसेवक इब्राहिम बोहरी,सुभाष हुंगे-पाटील,नागेश क्षिरसागर,यमाजी गवळी,भाऊसाहेब जगताप आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्व.नारायणराव धोत्रे यांच्या स्मृतीनिमित्त माता-भगिनींना आ.प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.तर परिसरातील नागरिकांच्या सोईसाठी आधार कार्ड काढण्याच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू वडार नवरात्र महोतस्व मंडळ,न्यू वडार गणेशोत्सव मंडळ,आदीशक्ती तरुण मंडळ,शिवरत्न तरुण मंडळ,शिवस्मारक तरुण मंडळ,रामजाने तरुण मंडळ आदेी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
