जेव्हा कतरिना कैफ तुमच्या मागील सीटवर बसते….झोपलेल्या कतरिनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट

मुंबई : विमानातून प्रवास करताना कतरिनाला निवांत वेळ मिळाला. या वेळात तिने झोपणं पसंत केलं. पण त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या चाहत्याला कतरिनाला पाहून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे झोपलेल्या कॅटचा फोटो काढाला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवर लिहिलं आहे की, जेव्हा कतरिना कैफ तुमच्या मागील सीटवर बसते. हा फोटो आता व्हायरल झाला आहे.
          एका अतिउत्साही चाहत्याने कतरिना कैफच्या खासगी आयुष्यात अतिक्रमण केली आहे. या चाहत्याने विमानात झोपलेल्या कतरिना कैफचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. तिचा हा फोटो आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. कतरिनाला याबाबत अनभिज्ञ असताना चाहत्याने हे कृत्य केलं आहे.
             कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांचा फितूर सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. मागील काही दिवसांपासून कॅट आणि आदित्य ‘फितूर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. बिझी शेड्यूलमुळे ती खूप थकली होती. त्यामुळे संधी मिळाल्यावर हे कलाकार झोपण्याची संधी साधतात. त्याला कतरिनाही अपवाद नाही.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *