प्रथम काव्यतरंग संमेलनात रत्नप्रभा पाटील यांचे काव्यवाचन

     

पंढरपूर (प्रतिनिधी):- सांगोला येथे पार पडलेल्या प्रथम राज्यस्तरीय काव्यतरंग साहित्य संमेलनात पंढरीच्या कवयित्री रत्नप्रभा पाटील यांनी आपल्या विविध कवितांचे वाचन करुन पंढरपूरची शान अभिमानाने उंचावली. याचबरोबर मानेगाव येथे ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये ही त्यांनी आपल्या वास्तववादी कवितांचे वाचन करुन दाखवत उपस्थितांची मने जिंकली.
            नुकतेच सांगोला येथे पहिले राज्यस्तरीय काव्यतरंग साहित्य संमेलन पार पडले. यामध्ये रत्नप्रभा पाटील यांनी आपली गाजलेली ‘देव नाही आमचा विचारच बाटला’ ही कविता वाचली.  संपुर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या त्यांच्या वरील कवितेशिवाय अन्य कांही कवितांचेही त्यांनी वाचन केले. त्यांचे यापूर्वी दोन कविता संग्रह प्रसिध्द झालेले आहेत. लवकरच आणखी एका कविता संग्रहाचे व दोन कादंबर्‍यांचे प्रकाशन होणार असल्याचे त्यांनी   यावेळी सांगितले. नवोदित साहित्यीकांमध्ये एक प्रगल्भ कवयित्री म्हणून त्यांनी ख्याती मिळविली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *