पंढरपूर प्रतिनिधी दि.24 सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या जयंती निमित्त दि.27 व 28 फेब्रुवारी
रोजी होणार्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवामध्ये राज्यातील सात निवडक संघांना प्रवेश देण्यात आला
आहे. अशी माहिती सहकार शिरेामणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव
काळे यांनी दिली.
सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त कल्याणराव काळे जनकल्याण
युवामंचच्या वतीने दि.27 व 28 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय लावणी महोत्सव होणार आहे. लावणी
महोत्सवाचे 11 वे वर्ष आहे. राज्यातील 7 निवडक संघांना प्रवेश देण्यात आला आहे. दि.27 व 28
फेब्रुवारी रोजी मृणाल कुलकर्णी (इश्काची लावणी), संगिता परभणीकर-प्रिया नगरकर (न्युआंबिका कला
केेंद्र चौफुला ग्रुप), अनिता,मनिषा, पुजा दिघोळकर सनसवाडी, कल्पना-रोहिणी सांगवीकर पुजा कला
केंद्र सनसवाडी, रुक्मिणी कराडकर (नवरत्न संगीत पार्टी), किर्ती देशमुख-सारीका नगरकर (नखरेलनारी
पुणे), सुवर्णा-रेखा ओतुरकर (पिंजरा कला केंद्र वेळे) हे संघ सहभागी होणार आहेत.
लावणी महोत्सवाचे उदघाटन शनिवार दि.27 फेब्रुवारीला सायंकाळी 07.00 वाजता सिनेअभिनेत्री
मृणाल कुलकर्णी यांचे हस्ते होणार असून लावणी क्षेत्रातील जेष्ठ कलावंत उपस्थित राहणार आहेत. या
कलेसाठी योगदान दिलेल्या राज्यातील जेष्ठ कलावंतांचा सन्मान यावेळी करण्यांत येणार आहे.

