पुण्यात मंगळवारपेठेत भीषण आग

               पुणे, दि. ९ – मंगळवार पेठेतील भिमनगर झोपडपट्टीमध्ये सोमवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत दहा ते बारा झोपड्या जळाल्या असून पाच गॅस सिलेंडर फुटल्याची माहिती मिळाली आहे.
                 अग्निशामक दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  वा-यामुळे आग पसरत चालली असून पत्र्याची घरे असल्यामुळे आग झपाट्याने वाढत आहे. झोपडपट्टीच्या एका बाजुला तारेचे कुंपण असून अरुंद गल्ली बोळांमुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवानांचे मदतकार्य सुरु आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *